सिन्नर क्राईम

सिन्नर क्राईम
Published on
पान-३ संक्षिप्त ---------- २०-१ जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न सिन्नर ः नादूरशिंगोटे येथील चकोर मळा येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडून एकमेकांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी दोन्हीकडील सात संशयितांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भाऊपाटील चकोर यांनी अंकुश चकोर, साईनाथ वाघ, बबन चकोर, अनिकेत आव्हाड यांच्याविरोधात तर साईनाथ वाघ यांनी ज्ञानेश्वर चकोर, भाऊपाटील चकोर, कार्तिक चकोर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. भांडणात लोखंडी सळई, लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडचा वापर झाला. त्यातून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी दोन्ही गटावर खून करण्याच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक कोठावळे तपास करत आहेत. ---------------- सिन्नर शहरातून बुलेटची चोरी सिन्नर ः सिन्नर बायपासवर असलेल्या वीर सावरकर नगरातून प्रशांत धनंजय लोखंडे यांची बुलेट (एमएच १५, जेबी ०२८२) चोरीस गेली आहे. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे बुलेट इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. सकाळी ती चोरीस गेल्याचे उघडकीस आले. घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हवालदार महिरे तपास करत आहेत. -------------- नायगावत गुटख्याचे १८८ पाऊच जप्त सिन्नर ः नायगाव येथे अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त संदीप तोरणे यांनी टाकलेल्या छाप्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचे १८८ पाऊच जप्त करण्यात आले. याबाबत पंकज राजेंद्र गायकवाड यांच्यावर एमआयडीसी पोलिसांनी अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रतिबंधित गुटखा, तंबाखू विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार शिंदे तपास करत आहेत. --------------------- वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार सिन्नर ः नाशिक- पुणे महामार्गावर दोडी शिवारात प्रवीण साहेब आव्हाड (२७, रा. खंबाळे) हे दुचाकीहून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात प्रवीण ठार झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनचालकाने वाहनासह पोबारा केला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार गोरे तपास करत आहेत. -------------------- सौर प्रकल्पातून केबलची चोरी सिन्नर ः देशवंडी येथील सौर प्रकल्पातून पाच हजार मीटर लांबीची केबल चोरट्य़ांनी चोरुन नेली. इन्व्हर्टरची डीसी केबल चोरीस गेल्याने ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रकल्पाचे अभियंता कुणार कारे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक टेमगर तपास करत आहेत. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com