फोटो-21520
सिन्नर ः निपेऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करताना संदीप सांगळे, रविराज इळवे, देवा झिंजाड, विष्ण वाघ आदी.
निपेऱ्या पुस्तकाचे
सिन्नरला प्रकाशन
सिन्नर, ता. २३ ः येथील वारकरी भवनात विष्णू वाघलिखित निपेऱ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ग्रामीण बोली, बदलते ग्रामजीवन, प्रथा, परंपरा यांचे प्रतिबिंब असलेल्या पुस्तकाचे अनेकांनी कौतुक केले. पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, अप्पर कामगार आयुक्त रविराज इळवे, पेन पब्लिशिंग हाउस प्रकाशनचे देवा झिंजाड, साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रशांत वाघ, संदीप राक्षे, देवीदास तांबे, तानाजी वाघ, जनाबाई वाघ, मीराबाई वाघ, संदीप देसले, वैशाली वाघ आदी उपस्थित होते.
डॉ. संदीप मराठे यांनी पुस्तकाचा नायक मराठी साहित्याला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतो, असे सांगितले. दालनात निपेऱ्या या पुस्तकाने मोलाची भर घातली असून, पर्यावरण रक्षण व वृक्षप्रेमाचा संदेश देणारे हे पुस्तक मराठी वाचकांच्या घराघरांत पोहोचले पाहिजे, असे अप्पर कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सांगितले. कवी किरण भावसार, गुणवंत कामगार गणेश तांबोळी, भरत मांडे, रवींद्र गिरी, नगरसेवक अनिल सरवार, सुनीता वाळुंज, प्रा. संजय पवार, सत्यजित कळवणकर, सोपान सानप आदी उपस्थित होते. प्रा. सुनीता सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री वाघ यांनी आभार मानले.
........................