फोटो- 21522
नाशिक ः गोंदेश्वराची प्रतिमा भेट देऊन सिटीलिंक सेवा बारागावपिंप्रीपासून सुरू करण्याची मागणी मनीषा खत्री यांच्याकडे करताना दत्ता गोसावी.
बारागावपिंप्रीपर्यंत सिटीलिंक बस वाढविण्याची मागणी
नाशिक महापालिका आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २२ ः सिटीलिंक बससेवा सध्या सिन्नर शहरातील कानडी मळ्यापर्यंत सुरू आहे. ही सेवा पुढे बारागावपिंप्रीपर्यंत वाढवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी केली. गोसावी यांनी याबाबत नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिले.
सिटीलिंकच्या बस कानडी मळ्यात उभ्या राहतात. तेथून बारागावपिंप्रीचे अंतर सहा किलोमीटर आहे. ही सेवा बारागावपिंप्री येथून सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. सुळेवाडी, पाटपिंप्री, निमगाव, हिवरगाव, केपानगर या गावांतील प्रवाशांची अडचण यामुळे दूर होईल. परिसरातील नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी नाशिकला ये-जा करतात. ही बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होणार असून, सिटीलिंकला यातून उत्पन्न मिळणार आहे. शिवाय बस उभ्या करण्याचा प्रश्नही निकाली निघेल. त्यामुळे ही सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी गोसावी यांनी केली.
.................