लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक

लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक
Published on
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक सिन्नर, ता. २२ : उद्योगभवन परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. दोन वर्षापासून सोबत राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक करणारा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जयवंत रवींद्र ठाकरे (रा. अकन्टमोराणे, ता. जि. धुळे) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. पिडीत महिला व ठाकरे यांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. ते येथील उद्योगभवन परिसरात एकत्र राहत होते. लग्न करण्याचे आमिष दाखवून ठाकरे याने पिडीतेशी शारिरिक संबंध ठेवले. पिडिता दोनदा गर्भवती राहिल्यानंतर गोळ्या आणून गर्भपात केल्याचे पिडितीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर २ जून रोजी पुणे येथे लग्न करण्यासाठी जाणार होते. त्यासाठी पैसेही जमा केले होते. परंतु, ठाकरे हा पैसे घेऊन पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिस ठाण्यात जयवंत ठाकरे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com