खासदार राजाभाऊ वाजे यांचा
रविववारी सिन्नरला नागरी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २३ ः आपल्या ठाम भूमिकेमुळे चर्चेत आलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचा रविवारी (ता. २८) दुपारी चारला ज्वालामाता लॉन्स येथे नागरी सत्कार सोहळा होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी असतील. माजी आमदार विलास लोणारी यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पडलेल्या फुटीनंतर नऊपैकी सहा खासदारांनी सत्ताधारी गटाची वाट धरली. या घडामोडीत खासदार वाजे यांच्यापुढे आलेल्या राजकीय प्रस्ताव आणि वाजे यांची ठाम भूमिका यामुळे देशभर चर्चा झाली. बदलत्या राजकीय समीकरणांच्या काळात स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक झाले.
याच पार्श्वभूमीवर सिन्नरमध्ये होणारा नागरी सत्कार हा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
.............
चौकट
नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान
प्रसिद्ध कवी व वक्ते दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, या वेळी त्यांचे व्याख्यान होणार आहे. सामाजिक आणि राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर निष्ठा, विचार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी या विषयांवर ते बोलणार आहेत.