सिन्नरला होणार उपविभागीय कार्यालय, दोन तहसीलदार महसूल विभागाने मागितला अहवाल

सिन्नरला होणार उपविभागीय कार्यालय, दोन तहसीलदार  महसूल विभागाने मागितला अहवाल
Published on
फोटो ः सिन्नर तहसील कार्यालय सिन्नरला होणार उपविभागीय कार्यालय दोन तहसील कार्यालयांचेही विभाजन; नागरिकांकडून स्वागत सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २३ ः महसूल कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी सिन्नरला उपविभागीय महसूल कार्यालयासह दोन तहसील कार्यालये होणार आहेत. याबाबत महसूल विभागाने हरकतींसह अभिप्राय मागवला आहे. विभागाचे सहसचिव अजित देशमुख महसूल पुनर्रचनेबाबत पत्र काढले आहे. १२ जूनपर्यंत याबाबत अहवाल सादर करावा लागणार आहे. सिन्नरला उपविभागीय कार्यालय करण्याचे नियोजन आहे. सद्यःस्थितीत निफाड उपविभागीय कार्यालय असून, सिन्नरच्या नागरिकांना निफाडला कामकाजासाठी जावे लागते. शिवाय तालुक्यात महसुली कामकाजावर मोठा ताण आहे. तालुक्यात येणारे मोठे प्रकल्प, गौण खनिज, जमिनीचे वाद-विवाद, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यासाठी उपलब्ध महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडतो. त्यामुळे तालुक्यात उपविभागीय कार्यालय होणार असल्याने त्याचे स्वागत होत आहे. उपविभागीय कार्यालयासोबतच दोन तहसील कार्यालयाचेही विभाजन होणार आहे. अपर तहसीलदार व तहसीलदार असे नियोजन असल्याने महसूल विभागाच्या येथील कामकाजाला चालना मिळणार आहे. महसूल विभागाने याबाबतचा हरकतींसह अभिप्राय सादर करण्याच्या सूचना केल्याने विभाजनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. ......... महसूल मंडळांचे असे असेल विभाजन सिन्नर, नायगाव, पांढुर्ली, सोनांबे, डुबेरे या पाच महसूल मंडळांचा भार अपर तहसीलदारांच्या कार्यालयाकडे असेल. तर गोंदे, नांदूरशिंगोटे, वावी, शहा, वडांगळी, पांगरी बुद्रुक, देवपूर ही सात महसूल मंडळे सिन्नर तहसीलदारांकडे असणार आहेत. सध्याच्या तहसील कार्यालयात नवीन कार्यालयांसाठी जागा नसल्याने नव्याने तहसील कार्यालयाचीही गरज भासणार आहे. मनुष्यबळासह कार्यालयाची तजवीज कोठे होणार, याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com