पथविक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधीचे वितरण

पथविक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधीचे वितरण
Published on
फोटो ः 21545 सिन्नर ः पंतप्रधान स्वनिधी योजनेची माहिती पथविक्रेत्यांना देताना विठ्ठल उगले, अभिजित कदम आदी. समवेत लता हांडे, आशा करपे आदी. --- पथविक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधीचे वितरण सिन्नरमध्ये लाभार्थ्यांना विनातारण कर्ज वितरण सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २४ : शहरातील पथविक्रेत्यांसाठी नगर परिषदेच्या वतीने लोकमंगल कल्याण मेळावा घेण्यात आला. यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांना विनातारण कर्ज वितरण करण्यात आले. पथविक्रेत्यांची माहिती भरण्याचेही काम सुरू करण्यात आले. -- खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजीत कदम, आरोग्य सभापती ललिता हांडे, नगरसेविका कांताबाई जाधव, गीता वरंदळ, आशा करपे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक अक्षय मरभळ, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गौरव भोंग आदी उपस्थित होते. पीएम स्वनिधी योजनेस नुकतेच सहा वर्षे पूर्ण झाली असून, शहरातील एक हजार ३७९ पथविक्रेत्यांना पहिल्या टप्प्याचे एक कोटी ४५ लाख, ४७६ पथविक्रेत्यांना दुसऱ्या टप्प्याचे एक कोटी एक लाख, १४६ विक्रेत्यांना तिसऱ्या टप्प्याचे ७३ लाख रुपये उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या निधीतून उन्नती साधण्याचे आवाहन विठ्ठल उगले यांनी केले. डिजिटल व्यवहार प्रोत्साहनपर वार्षिक बाराशे रुपयांपर्यंत कॅशबॅक उपलब्ध करून देण्यात येत असून स्वनिधी योजनेत बदल करून सदर योजनेस मार्च २०३० पर्यंत केंद्र सरकारने मुदतवाढ दिली असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com