फोटो ः 21549
सिन्नर ः महाविद्यालयात झाडांचे रोपण करताना एनसीसी कॅडेट्स.
---
सिन्नर महाविद्यालयात
‘एनसीसी’तर्फे बीजारोपण
सिन्नर : जी.एम.डी. आर्ट्स, बी.डब्ल्यू. कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी १५० पिशव्यांमध्ये देशी झाडांच्या बियाणांचे रोपण केले. यामध्ये बहावा, सीताफळ, जांभूळ व करंज या झाडांच्या बियांचा समावेश आहे. पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. संदीप भिसे आदी उपस्थित होते.
---