SNR26B21563
नाशिक : नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्यांवर चर्चा करताना मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह नरेश पाटील आदी.
शैक्षणिक ७६ दिवसांच्या सुट्यांचे नियोजन
मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग संयुक्त बैठकीत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २५ : जिल्हा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त बैठकीत शैक्षणिक वार्षिक सुट्यांचे नियोजन करण्यात आले. एकूण ७६ सुट्यांबाबत विचारविनिमय करण्यात आला.
उपशिक्षणाधिकारी नरेश पाटील, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रदीप सांगळे, सचिव एस. बी. देशमुख आदी उपस्थित होते. मागील वर्षाच्या सुट्या, राज्य शासनाने घोषित केलेल्या प्रासंगिक सुट्या, दिवाळी व उन्हाळी सुट्या, मुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्या तसेच महसूल आयुक्तांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुट्या यांचा विचार करून एकूण ७६ दिवसांच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक संघाचे शहराध्यक्ष सुरेश घरटे, उपाध्यक्ष लक्ष्मण बेनके, डॉ. अनिल माळी, मोहन चकोर, अर्जुन घोडेराव, बी. एल. वाबळे, शिक्षकेत्तर संघटनेचे सतीश नाडगौडा, प्रभाकर कासार, भगवान गोसावी, विजय पाटील, आर. आर. सैंदाणे आदी उपस्थित होते.