भाजपकडून आणीबाणीच्या निषेधार्थ आज काळा दिवस

भाजपकडून आणीबाणीच्या निषेधार्थ आज काळा दिवस
Published on
आणीबाणीच्या निषेधार्थ भाजपकडून ‘काळा दिवस सिन्नर, ता. २५ : भारतीय जनता पक्षाच्या सिन्नर शहर शाखेच्या वतीने २५ जून रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मरणार्थ ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. भाजप नेते उदय सांगळे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांवर झालेल्या आघाताचा निषेध करण्यात आला. यावेळी सिन्नर तालुका भाजप प्रभारी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, शहराध्यक्ष सजन सांगळे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, देवा वाजे, भाऊराव सदगीर, समाधान गीते, संकेत काकड, अतुल सानप आदी उपस्थित होते. उपस्थितांनी संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. SNR26B21565 सिन्नर : भाजप कार्यालयात आणीबाणीच्या निषेधार्थ काळा दिवस पाळताना पदाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com