शाळा व्हँन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थीचा विनयभंग

शाळा व्हँन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थीचा विनयभंग
Published on
२०-१ व्हॅनचालकाकडून मुलीचा विनयभंग -------------- सिन्नर ः विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोणारवाडी येथील व्हॅनचालकाने अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेत तिचा विनयभंग केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. सुनील शांताराम सपकाळ (३५) असे व्हॅनचालकाचे नाव आहे. शाळा सुटल्यावर सरदवाडी मार्गावरील एका साडेतेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला त्याने पास्ते येथे जायचे असून तेथून मुलांना घेतल्यानंतर तुला घरी सोडतो असे सांगून बंद कंपनीजवळील निर्जनस्थळी नेले. तेथे तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. रस्त्याने जात असलेल्या उडान फाउंडेशनच्या एका सदस्याला संशय आल्याने त्याने व्हॅनजवळ जावून पाहिले असता सपकाळ यास हटकले असता चालकाने तेथून पळ काढला. घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सपकाळ यास अटक केली आहे. त्याच्यावर विनयभंग, बाल लैंगिक अपराधापासन संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक रुपाली चव्हाण तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com