भाजपकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबांची भेट

भाजपकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबांची भेट
Published on
भाजपकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबांची भेट सिन्नर, ता. २६ : देशात २५ जून १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आले होते. अनेकांना मिसा कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. अशा कुटुंबांची येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून त्यांचा गौरव केला. येथील डॉ. दिनकर देशपांडे यांच्या पत्नीची भेट घेवून त्यांचा पदाधिकाऱ्यांनी गौरव केला. आणीबाणीच्या काळातील लोकशाहीच्या रक्षणासाठी अनेकांनी योगदान दिले. अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वसंतराव फडके यांच्या पत्नीचाही पदाधिकाऱ्यांना गौरव केला. यावेळी त्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देण्यात आला. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सजन सांगळे, बहिरू दळवी, सविता कोटकर, डॉ. दीपककुमार श्रीमाली, मीरा सानप, अतुल गुजराती, संदीप गुजराती, दत्तात्रय आचार्य, प्रमोद उगले, प्रियांका द्विवेदी, राजेंद्र देशपांडे, ताराबाई देशपांडे, गोपाळ भराडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com