पान-२ मेन
---------
सकाळ सिन्नर कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव
------------------
३१ व्या वर्धापनदिनी वाचक, हितचिंतक, विक्रेत्यांच्या उपस्थितीत रंगला स्नेहमेळावा
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१ ः सकाळच्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा ३१ वा वर्धापनदिन सोहळा सोमवारी (ता.३१) उत्साहात पार पडला. वाचक, हितचिंतक, जाहिरातदार आणि विक्रेत्यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा रंगला. सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये सायंकाळी झालेल्या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
----------------
उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मारुती दातीर, व्यवस्थापक (वितरण) बळिराम पवार यांनी मान्यवरांचे स्वागत करत शुभेच्छांचा स्वीकार केला. आमदार सत्यजित तांबे, आमदार गोकूळ गिते यांनी भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. ‘सकाळ’च्या हितचिंतकांनी शुभेच्छा देतानाच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके यासह शैक्षणिक साहित्य भेट दिले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या वस्तू वितरित करण्यात येणार आहेत.
राजकीय, सामाजिक, वैद्यकिय, उद्योग, सांस्कृतिक, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत सकाळला शुभेच्छा दिल्या.
सकाळ राबवत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची मान्यवरांनी प्रशंसा केली. जाहिरात व्यवस्थापक लखन महात्मे, साहाय्यक व्यवस्थापक (जाहिरात) मयूर रौदळ, साहाय्यक व्यवस्थापक (जाहिरात) सचिन पांजगे, सिनिअर एक्झ्युकेटिव्ह (वितरण) गणेश पगार यांनी स्वागत केले.
----------------