SNR26B22564
सिन्नर ः लोकनेते वाजे विद्यालयात पार पडलेल्या गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थीनी.
-------------------
सिन्नरला वाजे विद्यालयात
गणेशमूर्तीची कार्यशाळा
-----------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.२ ः पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीतर्फे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात पर्यावरणपूरक गणेश निर्मिती कार्यशाळा पार पडली. शाडू मातीपासून मूर्ती बनविण्यात आल्या. यात २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना शाडू मातीचा योग्य वापर, मूर्तीची रचना व निर्मितीतील बारकावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकता व सर्जनशीलतेला चालना मिळाली. शाडू मातीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत होते, असे मुख्याध्यापक राम ढोली यांनी सांगितले.
भाग्यश्री मोरे ही प्रथम आली. माधवी कोकणे द्वितीय, संस्कृती राऊत तृतीय आली. धनश्री सांगळे, व रवीना वाघ यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. उत्कृष्ट गणेशमूर्ती निर्मितीबद्दल बक्षिसे देण्यात आली. लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा स्मिता थोरात, संगीता वाजे, वैशाली सानप, अपर्णा क्षत्रिय, संगीता कट्यारे, डॉ. विष्णू अत्रे, डॉ. कल्पना अत्रे, डॉ. विजय लोहारकर, डॉ. सुजाता लोहारकर, सोपान परदेशी, मनीषभाई गुजराती, राहुल पगारे, परेश जुमानके यांचे सहकार्य लाभले.
-----------