SNR26B22575
नाशिक ः बॉश कौशल्य विकास केंद्रात झालेल्या कार्यशाळेत सहभागी झालेले शताब्दी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
------------------
शताब्दीच्या विद्यार्थ्यांसाठी
‘कौशल्य’तर्फे कार्यशाळा
--------------
सिन्नर, ता. ३ ः आगासखिंड येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची नाशिकच्या कौशल्य विकास केंद्रात पाच दिवसीय औद्योगिक कार्यशाळा घेण्यात आली. यात अत्याधुनिक यंत्रणा, सुरक्षितता याचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यात आला.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. आधुनिक विद्युत वायरिंग पद्धती, सुरक्षितता मानके, विविध विद्युत उपकरणांच्या प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रात वायरिंगची ओळख, कटिंग व सोल्डरिंग तंत्र, दुसऱ्या सत्रात मॉड्युलर स्विचेसची वायरिंग व वायरिंग बोर्ड असेंब्ली, तिसऱ्या सत्रात मॉड्युलर बोर्ड बसविण्याची प्रक्रिया, चौथ्या सत्रात एमसीबी, मॉड्यूल वर्गीकरण व डीपी कनेक्शन, तर सत्रात एनर्जी मीटर बसविणे, आरसीसीबी, एमसीबी, कमर्शियल वायरिंग याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
बॉशचे तज्ज्ञ प्रशिक्षक नीलेश खळकर, उल्का म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्यांमध्येही वाढ झाली. संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रितम वीर, डॉ. स्नेहा वीर यांचे सहकार्य लाभले. संकुलाचे प्रमुख डॉ. सी. के. पाटील, प्राचार्य डॉ. एस. जे. बागूल यांचे पाठबळ मिळाले. विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------