खडीक्रशर धारकांनी रस्त्यांचे केले मबजुतीकरण वडगाव पिंगळ्यातील ग्रामस्थांना दिलासा

खडीक्रशर धारकांनी रस्त्यांचे केले मबजुतीकरण  वडगाव पिंगळ्यातील ग्रामस्थांना दिलासा
Published on
पान दोन ----------------- 22583 सिन्नर : वडगाव-पिंगळा – खडीक्रशरधारका यांनी मिळून मजबुतीकरण केलेला रस्ता. सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ४ : वडगाव-पिंगळा गावाला जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यात आले. खडीक्रशर उद्योग संचालकांकडून हे काम करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून शेतमालाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले आहे. खडी क्रशर उद्योगामुळे होणाऱ्या अवजड वाहतुकीने वडगाव-पिंगळा गावाला जोडणाऱ्या रस्ते खड्डेमय झाले होते. या रस्त्यांची दुरुस्ती मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार कोकाटे यांच्याकडे केल्यानंतर कोकाटे यांनी प्रशासन, ग्रामस्थ आणि क्रशरधारक यांच्यात समन्वय घडवून आणला. त्यानंतर आमदार कोकाटे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्रशरधारकांची संयुक्त बैठकही पार पडली. यात क्रशर वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण आणि भविष्यातील काँक्रिटीकरणाच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक मोऱ्या, पूल व इतर संरचनांचा समावेश करावा, रस्त्यांची आवश्यक रुंदी साडेपाच मीटर ठेवून अंदाजपत्रके तयार करावीत तसेच सर्व रस्त्यांचा एकत्रित विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी केल्या. कामांचा आराखडा पूर्ण होईपर्यंत क्रशरधारकांनी संबंधित रस्त्यांची डागडुजी, रुंदीकरण व मजबुतीकरणाची कामे सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. -------- या रस्त्यांचे झाले मजबुतीकरण जोगेश्वरी स्टोन क्रशर, नाथकृपा स्टोन क्रशर, रेणुका माता स्टोन क्रशर आणि पॅरामाउंट इन्फ्रा प्रॉडक्ट्स यांनी एकत्र येऊन वडगाव पिंगळा गावाला जोडणाऱ्या पळसे साखर कारखाना रस्ता, विंचूर दळवी रस्ता, मुठाळ वस्ती रस्ता तसेच जामगाव घाट–हराळे वस्ती रस्ता यांचे मजबुतीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com