SNR26B22611
सिन्नर ः पोलिस ठाण्यात गणेशोत्व मंडळांचे पदाधिकारी, पोलिस पाटलांच्या बैठकीत उत्सव अटी, परवानगींबाबत माहिती देताना श्रीराम पवार.
------------------
रस्त्यांत मंडप, गुलालाची उधळण नको
-----------
सिन्नरला शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचे आवाहन
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.५ ः गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत. रस्त्यांत मंडप टाकू नये, मिरवणुकीत गुलालाची उधळण करता येणार नाही. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिला.
शहर व ग्रामीण भागातील मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलिस पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निरीक्षक पवार यांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. गणेशमूर्ती स्थापनेपूर्वी मंडळांनी आँनलाईन परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मिरवणुका वेळेत सुरु करुन त्या दिलेल्या वेळेपूर्वी संपविण्याचे आवाहन केले. मिरवणुकीचा पारंपारिक मार्ग बदलू नये, मूर्तीच्या ठिकाणी रात्री व दिवसा स्वयंसेवक नेमून २४ तास नजर ठेवावी, अशा सूचना केल्या.
गणेशमूर्ती स्थापना, मंडप उभारणी, सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूक, विसर्जन मिरवणूक यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याने विनापरवानगी या बाबी करता येणार नसल्याचे सांगितले. परवानगी घेताना आनलाईन प्रक्रियेत मंडळाचे नाव, पत्ता, अध्यक्ष, सचिव, मोबाईल क्रमांक, स्थापन व विसर्जन वेळ आणि दिनांक, मंडपाचा आकार, स्वरुप, मिरवणुकीचा मार्ग, ध्वनीक्षेपक, अग्नीसुरक्षा व्यवस्था याची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास कारवाई करण्याचा इशारा श्रीराम पवार यांनी दिला. उत्सव साजरा करताना अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी व सामाजिक सलोखा बिघडणार नाही असे कार्यक्रम आयोजीत न करण्याचे आवाहन केले.
१६-१ चौकट
एक गाव गणपती हवा
सार्वजनिक हिताचा विचार करुन एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याचे आवाहन निरीक्षक श्रीराम पवार यांनी केले. गावांमध्ये एकत्र येवून हा उपक्रम गावाने राबवावा. यातून गावात सामाजिक उपक्रम राबवावे. एक गाव एक गणपती राबविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
--------------