पान-२ मेन
-----------
SNR26B22665
सिन्नर ः वैष्णवी आर्टमधील मूर्तींना रंगकाम करताना वैष्णवी जाधव.
---------------
५०-५
दरवाढीने मूर्तिकारांचे बिघडले गणित
---------------
सिन्नरला गणेशभक्तांकडून मागणी वाढली, सिन्नरला कारागिरांकडून अखेरचा हात फिरविणे सुरू
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १० ः गणेशमूर्तीं बनविण्याच्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने मूर्तींचे दर २५ ते ३० टक्के वाढले आहेत. विशेषतः रंगाच्या किमती वाढल्यामुळे कारागिरांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. दरम्यान गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. काही विक्रेत्यांनी परगावाहून मूर्ती आणत दुकाने थाटली आहेत.
---------------
घरगुती गणपतीच्या मूर्तींची निवड करताना भाविकांकडून किंमत कमी करण्याची मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तथापि, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे दर कमी करता येत नसल्याने ग्राहकही नाराज होत आहेत. मात्र मूर्ती बनवताना कोणतीही तडजोड न करता येत नसल्याची माहिती येथील मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांनी दिली. वैष्णवी आर्टच्या वैष्णवी जाधव, सुवर्णा गारे या महिला कारागिरांनी मूर्ती बनवण्यासाठी यंदा दरवाढीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले.
रंगाची एक लिटरची बाटली १०० रुपयांनी वाढली आहे. पीओपीची २५ किलोची गोणी पूर्वी १८० रुपयास मिळत होती, ती आता २३० रुपयांना मिळते. थिनर, पावडर, डिंक, सजावटीचे साहित्य यात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे. येथील मूर्तिकार बहुतांश कच्चा माल पेण, पनवेल येथून मागवतात. वाहतुकीतही वाढ झाल्याची माहिती कारागिरांनी दिली.
घरगुती गणपतीसाठी आपल्या आवडीच्या मूर्तीची निवड केली जाते. आत्तापासूनच लहान मुले पालकांसोबत गणपतीच्या मूर्ती पाहण्यासाठी बाजारपेठेत येत आहेत. आपल्या आवडीची मूर्ती पसंत करण्याचा त्यांचा उत्साह दिसून येत आहे. गणेशमूर्ती विक्रेत्यांनी विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील मूर्ती उपलब्ध करून दिली जात आहे. येथील कुंभारवाड्यात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी लहान-मोठ्या आकाराच्या मूर्तींची बुकिंग करण्यासाठी नागरिक आणि मंडळांचे कार्यकर्ते येत आहेत.
२०-२ चौकट
दत्त, नवनाथ, लालबागला मागणी
विविध प्रकारच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असल्या तरी दत्त, नवनाथ, लालबाग या मूर्तींना भाविकांकडून मागणी आहे. बालगणेश, श्रीकृष्ण, रुद्र गणेश, कमळासन, शयन, सिंहसनारुढ, विठ्ठलरुपासह विविध रूपातील गणेशमूर्ती विक्रीसाठी आहेत.
---------------
कोट
दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तीच्या मागणीत वाढ आहे. नाशिकहूनही मूर्तींची मागणी होत आहे. असे असले तरी यंदा गणेशमूर्ती उपलब्धतेत कमी पडणार नाही.
- वैष्णवी जाधव, मूर्तिकार, सिन्नर
------------------