फोटो-22700
सिन्नर ः सिद्धार्थनगरात नमो गार्डनच्या भूमिपूजनप्रसंगी सीमंतीनी कोकाटे, विठ्ठलराजे उगले, ललिता हांडे, अजय गोजरे, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सागर भाटजिरे, मनोज देशमुख, पंकज मोरे, कांताबाई जाधव आदी.
सिन्नरला नमो गार्डनचे भूमिपूजन
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार हक्काची जागा
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १३ ः आकर्षक प्रवेशद्वार, विविध देशी झाडे, व्यायाम साहित्यासह विविध सुविधा असलेला पहिले गार्डन सिद्धार्थ नगरात विकसित केले जाणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून व नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या पाठपुराव्यातून हे गार्डन होत आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते गार्डनचे भूमिपूजन झाले. आरोग्य सभापती ललिता हांडे, नगरसेवक अजय गोजरे यांच्या पुढाकाराने हे उद्यान साकारले आहे. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते सागर भाटजिरे, गटनेते मनोज देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, क्रीडा-शिक्षण सभापती कांताबाई जाधव, गीता वरंदळ, सुवर्णा उबाळे, नगरसेवक ॲड. पंकज जाधव, तसेच सुदर्शन नाईक, विलास जाधव, विजय वरंदळ, अशोक जाधव, हरिभाऊ वरंदळ, ज्ञानेश्वर उबाळे, सुनील खोळंबे, अक्षय कानडी, अमोल कासार आदी उपस्थित होते.
या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळा तसेच कुटुंबासमवेत वेळ घालविण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे.
सीमंतिनी कोकाटे यांनी सिन्नर शहरातील विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले. सिन्नर शहराच्या विकासाने वेग घेतला असून, नागरिकांच्या गरजा विचारात घेऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
...........
चौकट
शहराच्या विकासासाठी कटिबद्ध
नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी सिन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सिद्धेश्वरनगर येथे नागरिकांना उपयुक्त ठरेल असे चांगल्या दर्जाचे ‘नमो गार्डन’ उभे राहील, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ, सुंदर व हरित शहर बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.