पान दोन ॲंकर
---------------------
22709
सिन्नर : स्टाईसमध्ये वार्षिक बैठकीत सन्मानार्थी उद्योजकांसह अरुण चव्हाणके, प्रमोद महाजन व संचालक मंडळ.
स्टाईसतर्फे ३८ ज्येष्ठ उद्योजकांचा गौरव
१९८२ च्या आठवणींना मिळाला उजाळा
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १५ : तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या(स्टाईस) ४४ व्या अधिमंडळ वार्षिक सभेत ३८ ज्येष्ठ उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी १९८२ च्या आठवणींना उजाळा देत उद्योग स्थापन करताना आलेल्या अडचणीं, अनुभवांना उजाळा देण्यात आला. संस्थेच्या कार्यालयातील नंदलाल केला सभागृहात वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष अरुण चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी संचालक, उद्योजक, सभासद उपस्थित होते. बारामती येथे विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गत आर्थिक वर्षात निधन झालेल्या सहकार, कला, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना अभिवादन करण्यात आले.
अध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी वसाहतीचे शिल्पकार नानासाहेब गडाख, किसनराव चव्हाणके, प्रकाशशेठ शहा या संस्थापक त्रिमुर्तींना अभिवादन करुन विविध विकास कामांची माहिती दिली. पूर्ण झालेली विकासकामे, भविष्यात हाती घेण्यात येणारी प्रस्तावित विकासकामे याविषयी माहिती दिली. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्फत सुरू असलेल्या विविध माहिती दिली. या कामांचे सभासदांनी स्वागत केले.
संस्थेच्या विविध कामांबाबत सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. मनोगत व्यक्त करताना परस्पर सहकार्याची भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. सभासदांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे, एकजुटीने घेतलेल्या निर्णयामुळे खेळीमेळीच्या, उत्साही वातावरणात बैठक पार पडली.
---------
आठवणींना दिला उजाळा
संस्थेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या ३८ ज्येष्ठ उद्योजक सभासदांचा गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल ज्येष्ठ उद्योजकांनी संस्था व संचालक मंडळाचे आभार मानले. १९८२ ला उद्योग सुरू करताना आलेल्या आठवणींना उजाळा देत त्या काळात मिळालेली मदत व सहकार्य याबद्दल त्यांनी आठवणी सांगितल्या. उपाध्यक्ष प्रमोद महाजन यांनी आभार मानले. मानले.