पान-१ ॲंकर
SNR26B22730
विजयनगरात रिडींग न घेताच दिलेली देयके.
३६-३
सिन्नरमध्ये रीडिंग न घेताच वीज देयके
-----------
ग्राहकांत संताप, उशिराच्या देयकांमुळे जादा भुर्दंड, गत महिन्यातही असाच प्रकार
---------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१७ ः शहरातील विजयनगर भागातील वीज ग्राहकांना मीटरचे रीडिंग न घेताच वीज देयके मिळाली आहेत. अंदाजे देयकांमुळे ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय उशिरा देयके वितरित करण्यात येत असल्याने त्याचाही भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. चालू महिन्याच्या रिडिंगच्या रकान्यात ‘ उपलब्ध नाही’ असा शेरा मारण्यात आला आहे.
------------
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दत्ता शेळके यांनाच या अंदाजे वीज देयकाचा सामना करावा लागला आहे. विजयनगर परिसरातील अनेक वीज ग्राहकांना अशाच प्रकारे रीडिंग न घेताच अंदाजे देयके देण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत शेळके यांनी महावितरणचे ग्रामीण कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
रीडिंग न घेता अंदाजे देयके वितरित करणे ही प्रशासनाची चूक असून याबाबत ठेकेदारास पाठवून मीटर रीडिंग घेण्यात यावेत, त्यानंतर सुधारित देयके वितरित करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अंदाजे देयके मान्य नसल्याची तक्रार केली आहे.
१६-१
ग्राहकांचा वारंवार अनुभव
विजयनगरातील नागरिकांना अनेकदा रीडिंग न घेता देयके दिली जाण्याच्या घटना या अगोदरही घडल्या आहेत. शिवाय वितरणाची मुदत संपल्यानंतर त्याचे वितरण झाल्याबाबत गत महिन्यातही तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची पुनरावृत्ती झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
१६-१
उशिराच्या देयकांचा भुर्दंड
संबंधित ठेकेदार सातत्याने सवलतीच्या दिनाकांच्या तारखेनंतर उशिरा देयके वितरित करत आहेत. उशिराचा दंड विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. चुकीची बिले ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी अशीही मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे.
१६-१ चौकट
तर आयोगाकडे न्याय मागणार
वितरित केलेली बिले वीज ग्राहकास मान्य नाहीत. त्यात सुधारणा करावी. अन्यथा वीज ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सार्वजनिक दाद मागून न्याय मिळवावा लागेल असे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दत्ता शेळके यांनी म्हटले आहे.
-----------
कोट
मीटर रिडिंगसाठी असलेल्या एजन्सीला नोटीस बजावली आहे. पुढील महिन्यात संबंधित बिलांबाबत रीतसर देयके येतील.
- मनोहर पाटील, सहाय्यक अभियंता, महावितरण.
--------------