पाथरेला कार्पोरेट थाटाच्या इमारतीची उभारणी माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण

पाथरेला कार्पोरेट थाटाच्या इमारतीची उभारणी   माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
Published on
पान-१--ॲंकर ----------------- SNR26B22740 पाथरे ः माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या पाथरे हायस्कूलची अद्ययावत इमारत. ------------ ३६-३ पाथरेतील महाविद्यालयाच्या इमारतीचे २६ ला उद्घाटन ------------ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येणार ः नानासाहेब गडाखांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही होणार ------------ सकाळ वृतसेवा सिन्नर, ता.१८ ः माध्यमिक लोकशिक्षण मंडळाने पाथरे येथे एस. जी. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास कार्पोरेटच्या धर्तीवर इमारतीची उभारणी केली आहे. सिन्नरच्या औद्योगिक क्रांतीचे जनक व संस्थेचे संस्थापक माजी आमदार सूर्यभान तथा नानासाहेब गडाख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचीही उभारणी केली आहे. इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण शनिवारी (ता.२६) सायंकाळी पाचला होणार आहे. ----------------- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष दौलतराव मोगल, कार्यकारी संचालक अभिषेक गडाख आदी उपस्थित होते. अंजनाबाई सूर्यभान गडाख या हॉलचेही उद्घाटन होणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार आशुतोष काळे आदी उपस्थित राहणार असल्याचे आण्णासाहेब गडाख यांनी सांगितले. संस्थेने पाथरे येथील हायस्कुलाकरिता साडेतीन कोटी रुपये खर्चाची दुमजली इमारत बांधली आहे. अद्ययावत सुविधांनी युक्त इमारत असलेली तालुक्याच्या ग्रामीण भागातील ही पहिलीच शाळा आहे. ३२ वर्ग, ९०० विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा, संगणक व सायन्स लॅबची सुविधा, प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, डिजिटल अध्यापनाची सुविधा, प्रशस्त लायब्ररी, स्वच्छतागृह, मुबलक पाण्यासाठी सुविधा अशा सुविधा यात आहेत. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही स्वतःहून मदतीचा हात पुढे करून ९० लाख रुपये बांधकामासाठी दिले आहेत. त्यामुळे बालवाडी ते १२ पर्यंतच्या शिक्षणासाठी या अद्ययावत इमारतीच्या सुविधांचे पालकांकडून स्वागत केले जात आहे. ------------- SNR26B22739 पाथरे हायस्कूलच्या आवारातील पूर्णाकृती पुतळा. १६-१ नानांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तालुक्यातील औद्योगिक क्रांतीचा पाया रचणारे माजी आमदार सूर्यभान गडाख यांचा शाळेजवळ पूर्णाकृती साडेसहा फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. याचवेळी त्यांच्या कार्यावर माहिती असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आण्णासाहेब गडाख यांनी दिली. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com