गोंदेश्वर मंदिरावरील श्री गणेशाचे दुर्मिळ शिल्प चर्चेत

गोंदेश्वर मंदिरावरील श्री गणेशाचे दुर्मिळ शिल्प चर्चेत
Published on
SNR26B22742 सिन्नर ः गोंदेश्वर मंदिरावरील शिल्पपट्टीतील श्री गणेशाचे समुद्रमंथन करतानाचे शिल्प. ------------ ३६-२ गोंदेश्वर मंदिरावरील दुर्मिळ श्री गणेशाचे शिल्प चर्चेत ------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१८ ः गोंदेश्वर मंदिर हे शैव पंचायतन मंदिर असल्यामुळे येथे स्वतंत्र श्री गणेशाचे मंदिर आहे. गोंदेश्वर संघाकडून या पुरातन मंदारात दररोज पूजाविधी केला जात आहे. मुख्य गोंदेश्वर मंदिरावर श्री गणेशाचे समुद्र मंथनातील दुर्मिळ शिल्प चर्चेत आले आहे. --------------- गणेशोत्सव सुरु असल्याने या शिल्पाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. गोंदेश्वर मंदिराच्या दक्षिण अर्धमंडपाच्या छताला आधार देण्यासाठी असलेल्या षटकोनी शिल्पपट्टीत हे शिल्प आढळून येते. येथे रामायणातील वाली-सुग्रीव युद्ध प्रसंग, हत्तीची झुंज कोरलेले प्रसंग चितारलेले आहेत. छताच्या आग्नेय दिशेला समुद्रमंथनाची शिल्पपट्टी आढळून येते. गोंदेश्वर मंदिराचे अभ्यासक प्रा. जावेद शेख यांनी याबाबत माहिती दिली. या शिल्पपट्टीच्या उजव्या बाजूला मंदारसल पर्वत दैवी रूपात असून खाली असूर वासुकीच्या मुखाकडून ओढताना दिसत आहे. मंदार पर्वताच्या भोवती वासुकी नागाचे दोन वेटोळे पडलेले आहेत. डाव्या बाजूला नऊ देवता वासुकी नागाची शेपटीची बाजू ओढताना दिसत आहेत. यातील आठ देवता या द्विभुज असून चौथ्या क्रमांकाची देवता चतुर्भुज आहे. दोन हाताने शिल्पपट्टीला आधार दिला असून दोन भुजा झिजलेल्या आहेत. शिल्पपट्टीच्या देवता गणाच्या बाजूने पाचव्या क्रमांकावर गणपती नागाची शेपूट ओढताना दिसत आहे. या शिल्पात गजमुख व वरती मुकुट असून शरीर स्थूल स्वरूपाचे आहे. १६-१ राजस्थानातील शिल्पाशी मेळ समुद्र मंथन करताना श्री गणेश असणारे शिल्प हे दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण असून किरडू (राजस्थान) येथील बाडनेर जिल्ह्यातील १२ व्या शतकातल्या सर्वेश्वर मंदिर, सोसीया (राजस्थान) येथील सचियाय माता मंदिर या दोन ठिकाणी असे शिल्प आहेत. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com