SNR26B22746
वावी ः महावितरण कार्यालयात वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन देताना स्नेहल भंडाळे, विजय काटे, कृष्णा घोटेकर, राहुल कहांडळ आदी.
--------------
गणेशोत्सव काळात तरी
वीजपुरवठा सुरळीत ठेवा
---------------
वावी परिसरातील नागरिकांचा संताप
-------------
सिन्नर, ता.१८ ः वावी व परिसरातील गावांत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सतत खंडीत होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर त्याचे सावट आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. वावी पोलिस ठाण्यालाही निवेदन दिले आहे.
वावी परिसरात दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व मेडिकल व्यावसायिकांची मोठी अडचण होत आहे. विजेअभावी व्यवसायांचे नुकसान होत आहे. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. मात्र गणेशोत्सव मंडळांनी आयोजीत केलेले विविध उपक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. श्री गणेशाची आरतीही अंधारात करण्याची वेळ मंडळांवर आली आहे. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा स्नेहल भेंडाळे, वावीचे सरपंच विजय काटे, घोटेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा घोटेकर, राहुल कहांडळ, रवींद्र कहाडंळ, संदीप कर्पे, शुभम भेंडाळे, रवींद्र खरात, पाराजी पवार, दीपक कहांडळ, शुभम थोरात, मीननाथ थोरात, संजय कोकणे, ज्ञानेश्वर कहांडळ, रवींद्र सरोदे, अक्षय खरात, अल कहांडळ, मनोज कहांडळ, राजेंद्र कहांडळ यांच्यासह फुलेनगर, कहांडळवाडी, दुशिंगपूर आदी गावांतील नागरिकांनी वीज महावितरणच्या वावी येथील कार्यालयात निवेदन दिले.
---------------