SNR26B22750
सिन्नर ः अभियंता दिन कार्यक्रमप्रसंगी उपस्थित उमेश वानखेडे, मिलिंद शेटे, विवेक सोनजे, समाधान गायकवाड, ज्ञानेश्वर इलग आदी.
------------------
३६-४
सिन्नरमध्ये बांधकाम उद्योगाला भविष्य
-----------
उमेश वानखेडे ः सिन्नर क्रेडाईतर्फे अभियंता दिनाचा कार्यक्रम
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१८ ः सिन्नर हे भविष्यातील नाशिक आहे. सिन्नरला खूप चांगल्या कनेक्टिव्हिटी असून यापुढे त्यांचा विस्तार होणार आहेत. त्यामुळे येथील बांधकाम उद्योगाला चांगले भविष्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प येऊ शकतात, असे प्रतिपादन क्रेडाईचे राज्य सहसचिव उमेश वानखेडे यांनी केले.
येथील पंचवटी हॉटेलमध्ये झालेल्या अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. क्रेडाईच्या सिन्नर शाखेतर्फे अभियंता दिन पार पडला. इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद शेटे, अल्ट्राटेक सिमेंटचे विभाग प्रमुख विवेक सोनजे, क्रेडाईचे शाखाध्यक्ष समाधान गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इलग, सचिव उमेश उगले, कोषाध्यक्ष सचिन हगवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. वानखेडे म्हणाले,‘ व्यावसायिक, सरकारी अधिकारी, राजकारणी यांना एकत्र करून सिन्नर सिटीजन फोरमसारखी संस्था सुरु होणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रेडाईने काम करावे. भविष्यात चांगले हॉटेल्स, वेअर हाऊस, फूड प्रक्रिया केंद्र असे वेगवेगळ्या प्रकारची काम करण्याची संधी क्रेडाईला असल्याचे त्यांनी सांगितले.
मिलिंद शेटे यांनी सिन्नरमध्ये मोठ प्रकल्प येत असल्याचे सांगून सुरुवातीपासूनच प्लंबिंग कन्सल्टंटची नेमणूक करून प्लॅंबिंग विषयाला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. प्लॅंबिंग, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या गोष्टींवर होणारा खर्च कमी करता येतो, असे सांगितले. समाधान गायकवाड यांनी स्वागत केले. अनिकेत यांनी सूत्रसंचालन केले. उमेश उगले यांनी आभार मानले.
----------------