SNR26B22756
सिन्नर ः सिध्देश्वरनगरात गॅस सिलिंडरला लागलेली आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर करताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.
------------------
३०-२
सिन्नरला गणेशोत्सवानिमित्त
आग प्रतिबंधक जनजागृती
-----------
नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून उपक्रम
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१९ ः नगरपरिषदेतर्फे सिध्देश्वरनगरात गणेशोत्सवात नागरिकांची आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या संकल्पनेतून अग्निसुरक्षा उपक्रम शहरात हाती घेण्यात आला आहे. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
अग्निशमन दलातील आकाश देवकर, सागर डावरे, सौरभ भागवत, वैभव केदार, अक्षय लोणारे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. साक्षी खालकर, भाग्यश्री ठाकरे, सुरेखा कुऱ्हाडे, रंजना खालकर, स्वाती अनवट, वृषाली गिते या महिलांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेत गॅस सिलिंडरला आग लागल्यानंतर ती विझवून दाखवली.
शहर व उपनगरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या गणेशत्सवात आरती करतेवेळी नागरिकांची गर्दी होते. नागरिकांना अग्निसुरक्षा उपक्रमातून आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. नगराध्यक्ष उगलेंच्या सुचनेनुसार प्रात्यक्षिकात महिलांनाही सहभागी करुन घेतले जात आहे. गॅस सिलिंडरला आग लागल्यास ओले बारदान सिलिंडरवर टाकून ही आग विझवता येते. त्याचबरोबर अग्निशमन सिलिंडरचा वापर करण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांवर माहिती देण्यात आली. आपत्कालिन स्थितीत वापरण्यात येणाऱ्या कटर यंत्राचीही माहिती देण्यात आली. या उपक्रमातून सिध्देश्वरनगरातील ३०० हून अधिक नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे.
-------------------