शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची मागणी
----------------------------------
भाजप किसान सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता.१४ : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नापिकी व ग्लोबल वॉर्मिंग च्या तडक्यात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत द्यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बिंदू शर्मा यांनी उपजिल्हाधिकारी कुंदन शिवाजी हिरे (प्रशासन) यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात,
नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे त्यांना तात्काळ पीक विमा मंजूर रक्कम अदा करावी.
शेतकरी बांधवांचे शेती मशागत खते बी बियाणे खरेदीचे दिवस असल्यामुळे पीक कर्ज तसेच तत्काळ कर्ज वितरित करावे. जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांना निर्देश द्यावेत.
केंद्र सरकारच्या हमीभाव योजने मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मका खरी केंद्रांवर ज्या ज्या शेतकऱ्यांनी मका विक्री केलेला आहे त्यांना शासन अनुदानाचे निमित्त न सांगता मक्याचे पैसे त्यांच्या बँक खाते विना विलंब वर्ग करावेत.
कुठल्याही शासकीय अनुदानाचे पैसे शेतकऱ्याला मदत जाहीर होते मात्र संबंधित बँक अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक कर्ज खात्यात वर्ग करते किंवा संबंधित पैशांना होल्ड ठेवण्याचा प्रकारेही वाढला आहे.विना विलंब अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे मिळावे. नाशिक जिल्ह्यात गारपीट अवकाळीत नुकसान पंचनामे झालेले त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा, सुधाकर पाटील, संजय सूर्यवंशी, कानू अहिरे, दिलीप भामरे आदीनी दिले.
सटाणा ः उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे यांना निवेदन देताना भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बिंदू शर्मा