गणेश विसर्जन मिरवणूक पोलिसांची तयारी

गणेश विसर्जन मिरवणूक पोलिसांची तयारी
Published on
गणेशोत्सवासाठी सटाणा पोलिसांचा व्यापक बंदोबस्त शहरातील २६, ग्रामीण भागातील ३० मंडळांना परवानगी; ३८ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १९ : गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडाव्यात, यासाठी सटाणा पोलिसांनी शहरासह बागलाण तालुक्यात व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष राहणार आहे. सटाणा शहरातील २६ मोठ्या गणेश मंडळांनी पोलिसांची अधिकृत परवानगी घेतली आहे. ग्रामीण भागातील ३० मंडळांनाही परवानगी देण्यात आली आहे. तसेच ३८ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सव काळात सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार अधिकारी, २८ कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील ३० अंमलदार आणि ४५ होमगार्ड तैनात राहणार आहेत. प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर, गणेश मंडळे आणि मिरवणूक मार्गांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.विसर्जनाच्या दिवशी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. एका अधिकाऱ्यासह एसआरपीचे ५० कर्मचारी बंदोबस्तात सहभागी होतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गरजेनुसार वाहतुकीत बदल केला जाणार आहे. कोट गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून मिरवणुकीत शिस्त राखावी. सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये. नागरिकांनी खात्री न करता कोणतीही माहिती पुढे पाठवू नये. संशयास्पद प्रकार किंवा अफवा आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. योगेश पाटील (पोलिस निरीक्षक कळवण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com