SUG26B03081
म्हसरूळ (नाशिक) ः येथे कोकणी-कोकणा समाज मंडळातर्फे झालेल्या गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित मंत्री नरहरी झिरवाळांसह मान्यवर व गुणवंत.
------------
कोकणा समाजाची वाटचाल प्रगतीकडे
--------------
नरहरी झिरवाळ ः विविध क्षेत्रातील गुणवंत,यशस्वितांचा गुणगौरव
------------
सकाळ वृत्तसेवा
सुरगाणा, ता.३१ ः आदिवासी कोकणी- कोकणा समाजाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू असून सर्वच क्षेत्रात आता आदिवासी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत, हिच खरी समाजाची प्रगतीची वाट आहे असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कोकणी कोकणा गुणवंत सत्कार समारंभात केले.
म्हसरूळ(नाशिक) येथील नाथकृपा लॉनवर हा सत्कार सोहळा झाला, त्याप्रसंगी मंत्री झिरवाळ बोलत होते. व्यासपीठावर आमदार मंजुळा गावित, माजी महापौर रंजना भानसी, एन. डी. गावित, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, कोकणा समाज सेवा संघाचे राज्याध्याक्ष जयवंत गारे, सचिव नामदेव ठाकरे, सहसचिव शिवाजी ठाकरे, उपाध्यक्ष चेतन खंबाईत, कार्याध्यक्ष चिंतामण गायकवाड, विश्वस्त रमेश साबळे, गितेश्वर खोटरे, संतोष इंपाळ, सरोज भोये, विमल बागूल, पदमाकर सहारे, किसन ठाकरे, राम चौरे, अशोक बागूल, के. के. गांगुर्डे, विनोद पवार, महेश टोपले, दत्तू पाडवी, मांगीलाल गांगुर्डे, जयराम गावित, दत्तू साबळे, रमेश साबळे, तुषार टोपले, मंगलदास गवळी, परशुराम पाडवी आदी उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ पुढे म्हणाले,‘ मंत्रालयात मी जेव्हा उच्चपदस्थ व्यक्तींची गावित, चौधरी, भोये, बागूल आदी कोकणा समाजाची नावे पाहतो तेव्हा समाधान वाटते, हीच वाटचाल पुढे ठेवत त्यांनीही आता समाजाला मार्गदर्शन करावे. मुंबई येथील नवरंग कार्यक्रमात आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींची देशभरात नव्हे तर जगभरात चर्चा झाली हेच खरे कार्य आहे. साक्रीच्या आमदार गावित, माजी महापौर भानसी, श्री. बागूल, श्री. ठाकरे, श्री. गवारी आदींनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात शालेय स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी, आदर्श उपक्रमशील शिक्षक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातील यशस्वितांचा गौरव करण्यात आला. परशराम पाडवी यांनी सूत्रसंचालन केले.
----------------