पान-२ मेन
फोटो-15858
केरसाणे : हनुमान मंदिराजवळ जमलेल्या बैलजोड्या.
....................
फोटो ओळी : 02201
ब्राह्मणगाव : बैलांचे पूजन करताना सुवासिनी.
...........
बागलाण तालुक्यात पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा
मोरकुरे येथे संबळच्या तालावर मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
तळवाडे दिगर, ता. ११ ः बागलाण तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात गुरुवारी (ता. १०) पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावात पोळा साजरा झाला. वर्षभर शेतात राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदिवासी बांधवांनी बैलांना सजवून त्यांची पूजा केली. गावागावांत संबळ या पारंपरिक वाद्याच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली. परिसर ढोल-ताशा आणि संबळच्या आवाजाने दुमदुमूला होता.
......................
आदिवासी संस्कृतीत पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी सकाळपासूनच शेतकरी बांधवांनी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घातली. त्यानंतर त्यांच्या पाठीवर नक्षीदार झुली, शिंगांना बेगड, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि कपाळावर बाशिंग बांधून सजवण्यात आले. संबळच्या तालावर नृत्याचा आनंद ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी बैलांसह घेतला. या पारंपरिक संगीताच्या सोबतीने प्रमुख मार्गांवरून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनींनी बैलांचे औक्षण केले. नंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला. ट्रॅक्टरच्या वाढत्या वापरामुळे शेतीतील बैलांचे महत्त्व कमी होत असले, तरी बागलाणच्या आदिवासी पट्ट्यात आजही ही परंपरा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संस्कृतीचा आणि पारंपरिक वाद्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.
.........................
आराईत उत्कृष्ट बैलजोडींचा सन्मान
आराई ः येथे ग्रामपंचायतीतर्फे पोळ्यानिमित्त विशेष बैलजोडी स्पर्धा झाली. या वेळी उत्कृष्ट बैलजोडींना रोख बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी एक हजार ५०१, द्वितीय एक हजार एक, तर तृतीय क्रमांकासाठी पाचशे एक रुपयाचे बक्षीस होते. सरपंच दिलीप सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते. ......................................................................................
-----
केरसाणेत साध्या पद्धतीने पोळा
नरकोळ ः केरसाणे (ता. बागलाण) व परिसरातील दसाने, पिंगळवाडे, मुंगसे, करंजाड आदी गावांमध्ये काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा येथे पोळा साधेपणाने साजरा झाला. सणाबाबत कोणताही उत्सव जाणवला नाही. गावागावांतील ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालून हा सण साजरा झाला. बैलांचा पोळा पाहण्यासाठी बालगोपाळानी गर्दी केली होती. घरोघरी महिलांनी बैलाचे औक्षण केले व मातीच्या बैलांचीही पूजा केली. ...............................................................................................
पावसाअभावी पोळ्यावर सावट
निमगाव ः यंदा पिकांची झालेली दुरवस्था व आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांना पोळा या वर्षी उत्साहाने साजरा करता आला नाही. त्यामुळे पोळ्यावरही दुष्काळाचे सावट होते. काही मोजक्या शेतकऱ्यांकडेच बैल शिल्लक आहेत. ट्रॅक्टरचे युग असल्याने बैलांचे काम कमी झाले. त्या परिस्थितीतही काही ठिकाणा पोळा साजरा झाला. शासनाने परिसरातील पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
..............................................................................................
ब्राह्मणगावला उत्साह
ब्राह्मणगाव ः येथे पोळा उत्साहात झाला. सकाळी शेतकऱ्यांनी बैलांना सजवून सायंकाळी हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून घरोघरी सुवासिनींनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. ग्रामीण भागात महिलांनी मातीच्या बैलांची पूजा केली. अमावास्या असल्याने सायंकाळी हनुमान मंदिरात नागरिकांनी गर्दी केली होती. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असला तरी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसत होता.
...........................................................