VAK26B01621
मोहिदा (ता. शिरपूर) : सुधारित मतदार यादी प्रसिध्द करतांना सरपंच दत्तू पाडवी, उमाकांत गुरव व ग्रामस्थ.
--------
मोहिदाची ८११ मतदारांची
सुधारित यादी प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
वकवाड, ता. ३ : मोहिदा (ता. शिरपूर) गावाची ‘एसआयआर’ उपक्रमांतर्गत भाग क्रमांक २९ ची सुधारित मतदार यादी मंगळवारी (ता. ३) सरपंच दत्तू पाडवी, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष बाबुलाल पावरा यांच्या हस्ते बूथ लेव्हल ऑफिसर उमाकांत हिरालाल गुरव यांनी प्रसिद्ध केली.
एप्रिल महिन्यापासून मतदार यादीच्या मॅपिंगचे काम सुरू होते. प्रारंभी एकूण ९२६ मतदारांची नोंद होती. पडताळणी प्रक्रियेत मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यानंतर ८११ मतदारांचा समावेश असलेली सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांनी प्रसिद्ध झालेल्या सुधारित यादीत आपले नाव व इतर तपशील तपासून खात्री करावी, असे आवाहन बूथ लेव्हल ऑफिसर उमाकांत गुरव यांनी केले आहे. या वेळी अरविंद पावरा, जगदीश पाडवी, रितेश पावरा, रोहिदास पावरा, ज्ञानेश्वर पावरा, सुरेश पावरा, वसंत पावरा, कैलास पावरा, सुरेश वसावे, वसंत सोलंकी, भारता पवार, रजाक पवार, देवराम पावरा आदी उपस्थित होते.