VAK26B01637
पळासनेर : उपसरपंचपदी सोनूबाई चारण यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांचा सत्कार करतांना सरपंच शितल कोळी, छोटू कोळी आदी.
------------
पळासनेरच्या उपसरपंचपदी
सोनूबाई चारण यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
वकवाड, ता. १५ : पळासनेर (ता. शिरपूर) येथील उपसरपंच पदाची निवड शनिवारी (ता. १२) ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच पार पडली. यात सोनूबाई देवा चारण यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी झालेल्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थांनी लोकनियुक्त सरपंच शितल छोटू कोळी होत्या.
बैठकीत उपसरपंच पदासाठी केवळ सोनूबाई देवा चारण यांचे एकमेव नामर्देशन पत्र दाखल झाले. वेळेत दुसरे कोणतेही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी प्रकाश बोरसे यांनी सोनूबाई चारण यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर झाल्यानंतर कैलास राजेंद्र पावरा यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित उपसरपंच सोनूबाई चारण यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गटनेते तथा ग्रामपंचायत सदस्य छोटू कोळी, कैलास पावरा, राजू भील, बाकाबाई पावरा, बिनाबाई पावरा, सपना चित्ते, सुरत भिल, ओसमाबाई पावरा, सतीश वाणी, बाकाबाई पावरा, लताबाई भील, योगेश माळी, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.