​वणी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; शिवनेरी चौकात ''शिव-शंभू'' जयघोष

​वणी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; शिवनेरी चौकात ''शिव-शंभू'' जयघोष
Published on
VNI26B12293 वणी ः येथील शिव- शंभू जन्मोत्सव समितीतर्फे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादनास उपस्थित ग्रामस्थ. --------------- ३०-२ छत्रपती संभाजी महाराजांना वणी ग्रामस्थांतर्फे अभिवादन --------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१५: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती वणी शहरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. येथील शिवनेरी चौकात शिव-शंभू जन्मोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. ------------ ​कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, आबासाहेब देशमुख, वमकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा, संताजी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, उपसरपंच विलास कड आदींनी प्रितमापूजन केले. रविकुमार सोनवणे, गणेश देशमुख, राजेंद्र गोतरणे, सचिन खाबिया, मिना पठाण, राकेश थोरात. ​राहूल गांगुर्डे, जगन वाघ, राजेंद्र थोरात, प्रकाश बोरा, संजय बच्छाव, फिरदोस पठाण, बाळासाहेब घडवजे, राहूल बच्छाव, परेश जन्नानी, मनोज बोथरा, पंजाबराव देशमुख, सुनिल तिडके, संतोष सातपुते, माणिक गांगुर्डे, धनंजय शिरसाट, प्रविण दोशी, दिगंबर पाटोळे, अनिल गांगुर्डे, नामदेव पैठणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील धगधगत्या संघर्षावर आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकला. महेंद्र बोरा, महेंद्र पारख, विलास कड, नितीन शेळके, गायत्री जाधव, गणेश खरे आणि राहुल बच्छाव व रविकुमार सोनवणे यांनी मनोगतातून माहिती दिली. गणेश खरे यांनी सूत्रसंचालन केले.सतीश पेंढारी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिव-शंभू जन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com