फोटो- 12456, 12457
वणी ः येथे मंगळवारी जोरदार झालेल्या पावसाने आठवडे बाजारात पाण्यात बुडालेला भाजीपाला..
जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी
सब होडींग..........
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ ः अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार (ता. २२) पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. जून संपत असताना झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली असी तरी एन निनोचे संकंट कायम आहे. मंगळवारी (ता. २३) दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाने दमदारा हजेरी लावली. काही ठिकाणी पाऊस झाल्याने व्यावसायिकांची धावपळ झाली.
........
वणी आठवडे बाजारात तारांबळ
वणी ः येथील मुख्य आठवडे बाजाराच्या दिवशीच मॉन्सूनच्या पहिल्यादांच जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारात आलेल्या शेतकरी, व्यावसायिक आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी अचानक दुपारी वणी परिसरात दमदार एन्ट्री केली. आज वणीचा मुख्य आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेकडो शेतकरी व किरकोळ विक्रेते आपला माल विकण्यासाठी बाजारात आले होते. मात्र दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचावासाठी बाजारात पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आडोसा शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. भाजीपाला, फळे आणि इतर अन्नधान्य उघड्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर भिजले. अनेक शेतकऱ्यांचा कोथिंबीर, मेथी, टोमॅटो यांसारखा नाशवंत माल पाण्यात वाहून गेला. कपडे, कटलरी आणि इतर वस्तूंची दुकाने थाटलेल्या छोट्या व्यावसायिकांना आपला माल गोळा करायला वेळच मिळाला नाही. ताडपत्री बांधेपर्यंत बहुतांश माल ओला झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचेही पावसामुळे धावपळ झाली.
.................