आता शाळा बंद करून गुरुजी निघाले मोहिमेला; विद्यार्थ्यांनी शिकायचं कुणाकडून? ​दिंडोरीत ३७२ शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती; २६ शाळांतील शंभर टक्के शिक्षकांना आदेश, शिक्षणावर परिणाम होण्याची भीती

आता शाळा बंद करून गुरुजी निघाले मोहिमेला; विद्यार्थ्यांनी शिकायचं कुणाकडून? ​दिंडोरीत ३७२ शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती; २६ शाळांतील शंभर टक्के शिक्षकांना आदेश, शिक्षणावर परिणाम होण्याची भीती
Published on
पान दोन मेन (किल्पआर्ट वापरावे) ------------------------ शिक्षक मोहीमेवर; विद्यार्थ्यांनी शिकायचं कुणाकडून? पालकांचा प्रश्‍न ; दिंडोरीत ३७२ शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती सकाळ वृत्तसेवा लखमापूर, वणी, ता. २६ : नवीन शैक्षणिक वर्षाची घंटा वाजून महिनाही उलटत नाही तोच, तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी प्रशासनाने तब्बल ३७२ शिक्षकांची ''सहाय्यक मतदार केंद्रस्तरीय अधिकारी'' म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी तालुक्यातील २६ शाळांमधील १०० टक्के शिक्षकांना या कामाचे आदेश देण्यात आल्याने ''आता शाळा बंद करून गुरुजी निघाले मोहिमेला; विद्यार्थ्यांनी शिकायचं कुणाकडून? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. ​​निवडणूक प्रक्रियेच्या नावाखाली प्रशासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार यादीच्या कामाला जुंपले आहे. मतदार यादी पुनरीक्षणाचे फॉर्म वाटप, माहिती संकलन, पडताळणी, डेटा एंट्री आणि सुनावणी नोटीस बजावणे यासारख्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा संपूर्ण वेळ वर्गखोल्यांबाहेरच जाणार आहे. ऐन अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच सर्व शिक्षक गायब होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन पूर्णपणे कोलमडणार आहे. आंदोलन छेडणार! ​प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून शिक्षकांवरील हा अतिरिक्त भार कमी करावा, अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा पालक आणि शिक्षणप्रेमींनी दिला आहे. आता प्रशासन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकतेनुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, निमशासकीय शाळांमधील कर्मचारी तसेच गावपातळीवरील पात्र व्यक्तींची मदत घेण्याबाबत विचार सुरू आहे. डॉ. आप्पासाहेब शिंदे, प्रांताधिकारी, दिंडोरी या शाळेतील शिक्षकांची नियुक्ती दिंडोरी-१, इंदिरानगर, जानोरी, परमोरी, साळुंखे, वांजुळे, विल्लरपाडा, शिंदपाडा, खेडगाव, शिंदवड, बोपेगाव, काळूबाबा, जऊळकेवणी, गोंडेगाव, तळेगाव वणी, वरखेडा, मातेरवाडी, आंबेवणी, घोडेवाडी, पिंगळवाडी, बाबापूर, मावडी, वणी मुली, दिंडोरी, अंबानेर-चामदरी, पायरपाडा. ​ शिक्षकांना देण्यात आलेली कामे ​मतदार यादी पुनरीक्षणाचे फॉर्म वाटप करणे, घरोघरी जाऊन माहिती संकलन व पडताळणी करणे, गोळा झालेल्या डेटाचे डिजिटलायझेशन व डेटा एंट्री करणे, सुनावणीची नोटीस बजावणे आणि अंतिम अहवाल सादर करणे.
Marathi News Esakal
www.esakal.com