पान-२ मेन
------------
12873
माळेगाव काजी : ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना केलेल्या कामांबाबत व खर्चाविषयी जाब विचारताना ग्रामस्थ.
----------------
विकासकामांच्या हिशेबावरून खडाजंगी
माळेगावच्या ग्रामसभेत तरुणीने आक्रमक होत विचारले प्रश्न; निरूत्तर अधिकाऱ्याचा काढता पाय
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ४ : माळेगाव काजी (ता.दिंडोरी) येथे बुधवारी (ता.२) झालेल्या ग्रामसभेत विकासकामांचा दर्जा, निधीचा विनियोग आणि मूलभूत सुविधांवरून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. पंधरावा वित्त आयोग, पेसा निधी तसेच विविध शासकीय योजनांतर्गत झालेल्या कामांचा खर्च, बिले आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती याबाबत जाब विचारण्यात आला. रोहिणी राऊत या तरुणीने आक्रमकपणे प्रश्न उपस्थित केल्याने ग्रामसभेचे वातावरण तापले. ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेतून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
-----------------
ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात बुधवारी (ता.२) सरपंच रचना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी वसंत थैल यांनी ग्रामसभा घेतली होती. ग्रामसभेत विविध योजनेंतर्गत विकासकामे झाली असली, तरी काही कामांचा दर्जा आणि खर्चाबाबत ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रत्यक्ष कामाच्या तुलनेत कागदोपत्री खर्चात तफावत असल्याचा आरोप करण्यात आला. कामांची बिले, मंजुरीचे ठराव, मोजमाप पुस्तिका व खर्चाचा संपूर्ण तपशील ग्रामसभेसमोर ठेवण्याची मागणी करण्यात आली.
१६-१
मग शुद्ध पाणी कधी?
रोहिणी राऊत यांनी रस्ते, शौचालये, पिण्याचे पाणी आदी प्रश्न उपस्थित केले. गावात विविध ठिकाणी पथदीपांची व्यवस्था केली; मात्र नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. बोअरच्या पाण्याने गावात मुतखड्याचे प्रमाण वाढले आहे. गावात एकही रस्त्याचे डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण नाही. नागरिक विद्यार्थ्यांना चिखल तुडवत चालावे लागत असल्याचे आरोप करण्यात आला.
१६-१
महिलांच्या सुविधाही चर्चेत
महिलांसाठी खरेदी केलेले सॅनिटरी नॅपकिन व डिस्पोजल मशिन ग्रामपंचायत कार्यालयात बंदिस्त असल्याचा आरोप रोहिणी राऊतने केला. महिलांना त्याच्या वापराबाबत मार्गदर्शनच मिळत नसेल तर या सुविधांचा उपयोग काय, असा प्रश्न करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
------------------------
विकासकामांसाठी निधी येतो; मात्र त्यातून नेमके काय काम झाले, याची माहिती ग्रामस्थांना मिळणे हा आमचा अधिकार आहे. सर्व कामांचा हिशेब पारदर्शकपणे ग्रामसभेत मांडवा.
- संजय गोतरणे, ग्रामस्थ माळेकाजी
------------
शासनाच्या विविध योजनांचा निधी किती येतो, कुठली कामे झाली याची पुरेशी माहिती दिली जात नाही. मासिक सभेत काही मुद्दे वाचून दाखवून सह्या घेतले जातात. ग्रामस्थांचे आरोप व मागण्या खऱ्या असून चौकशी झाली पाहिजे.
- भारती सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या
-----------
‘१५ ऑगस्टची ग्रामसभा झालीच नाही, ग्रामपंचायत अधिकाऱ्याने दुसऱ्या गावचा ग्रामसभेचा फोटो जोडून प्रशासनास ग्रामसभा झाल्याचे दर्शवून दिशाभूल केली. बुधवारच्या ग्रामसभेत प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी त्याला उत्तरे देणे अपेक्षित आहे. प्रश्न अनुत्तरित ठेवून अधिकारी निघून जाणे योग्य नाही. विकासकामांची चौकशी झाली पाहिजे.
- हिरामण माळेकर, माजी सरपंच
--------------
ग्रामपंचायतीने सॅनेटरी नॅपकीन डिस्पोजल मशिन खरेदी केलेले आहे. ते जुन्या ग्रामपंचायत इमारतीत बंदीस्त आहे यांची माहिती खुद्द महिला सरपंचांनाच माहिती नाही तर गावातील महिलांना कुठून मिळणार. मशिन खराब झाल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे उत्तर बेजबाबदारीचे आहे. सर्व आरोपाची प्रशासनाने चौकशीची मागणी करीत आहोत.
- रोहिणी राऊत, तरुणी, माळेदुमाला
--------------
दोन सप्टेंबरला तहकूब सभा व खर्चाबाबत गावकऱ्यांना सांगत होतो. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा ग्रामसभेवर बहिष्कार असल्याने ग्रामसभा नव्हती. यावेळी आयत्यावेळी काहींनी प्रश्न विचारले. त्याची व्हिडिओ शूटिंग केली व ते व्हायरल केले आहे.
- वसंत थैल, ग्रामपंचायत अधिकारी, माळेगाव काजी