विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शाळा प्राधिकरणाची : -अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे (

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शाळा प्राधिकरणाची : -अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे (
Published on
पान दोन ------------------- 12912 दिंडोरी : अन्न सुरक्षा व मानके या विषयावर कार्यशाळेत सहभागी मुख्याध्यापक. विद्यार्थ्यांना सुरक्षित व सकस आहार देणे सामुहिक जबाबदारी संदीप देवरे : दिंडोरीत ३३२ मुख्याध्यापकांसाठी ''अन्न सुरक्षा व मानके'' कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ९ : विद्यार्थ्यांचे आरोग्य ही शाळा प्राधिकरणाची सामूहिक जबाबदारी असून, शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित व सकस आहार मिळावा यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संदीप देवरे यांनी केले. दिंडोरी तालुक्यात ''अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक'' आणि ''शिक्षण विभाग, पंचायत समिती दिंडोरी'' यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न सुरक्षा व मानके (शालेय मुलांसाठी सुरक्षित अन्न व संतुलित आहार) विनियम, २०२० या विषयावर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांसाठी जनता विद्यालय, दिंडोरी येथे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेस तालुक्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांचे ३३२ मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमास अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी, शालेय पोषण आहार अधीक्षक पंडित गोंधळी, विस्तार अधिकारी परशुराम महाले, वंदना चव्हाण, अभिमन बहिरम, मुख्याध्यापक एस. पी. शेजवळ तसेच सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. सहायक आयुक्त देवरे यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार पौष्टिक, सुरक्षित आणि स्वच्छ असणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. शालेय स्वयंपाकगृहातील स्वच्छता, अन्नधान्याची योग्य साठवणूक, सुरक्षित पिण्याचे पाणी, भांड्यांची स्वच्छता आणि अन्न हाताळण्याची योग्य पद्धत यावर भर द्यावा. स्वयंपाकी व मदतनीस यांची अन्न सुरक्षा नोंदणी, वैद्यकीय तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, एप्रन आणि हेडकॅपचा वापर अनिवार्य करावा. स्वयंपाकगृहात माश्या व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी जाळ्या बसवणे, मुदतबाह्य पदार्थ न वापरणे आणि विद्यार्थ्यांना कुरकुरे, वेफर्स किंवा इतर जंक फूड न देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय पोषण आहार सहायक अमोल गंधे यांनी प्रयत्न केले. केंद्रप्रमुख नितीन बागूल यांनी सूत्रसंचालन तर प्रमोद शिरसाठ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com