सप्तशृंगी गड घाटात स्विफ्ट कारला भीषण आग रोपवे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला; काही काळ वाहतूक बंद

सप्तशृंगी गड घाटात स्विफ्ट कारला भीषण आग रोपवे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला; काही काळ वाहतूक बंद
Published on
फोटो- 12948 सप्तशृंगगड ः कारने घेतलेला पेट. सप्तशृंगगड घाटात कारला आग रोप वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; काही काळ वाहतूक बंद सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १३ : सप्तशृंगगड घाटातील गणपती पॉइंटजवळ शनिवारी (ता. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास दर्शनासाठी जाणाऱ्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार खाक झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानासह रोप वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने जीवितहानी टळली. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भाविक स्विफ्ट कार (एमएच १२ केएन ८६२५)ने सप्तशृंगगडावर दर्शनासाठी जात असताना घाटातील चढण चढत असताना वाहनाचे इंजिन गरम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने कार थांबवून पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी वाहनाने पेट घेतला. काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच नांदुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील आई व मुलाला सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, रोप वेचे कर्मचारी अमोल सुसुंद्रे, राजू रॉय, किशोर गांगुर्डे व विजू भाऊ यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक साधनाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यानंतर अग्निशामक दल व टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने नांदुरी पोलिसांनी घाटातील वाहतूक काही काळ बॅरिकेड्स लावून बंद केली होती. घटनेमुळे घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रशासनाने १० ते २६ सप्टेंबरदरम्यान शनिवार व रविवार वगळता घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार आज गड घाटरस्ता वाहतूकीसाठी खुला होता. घाट चढताना उतरतांना गाडीची योग्य तपासणी करून प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले. ...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com