श्री सप्तशृंग पतसंस्थेला
३१लाखांचा नफा
वणी, ता. १६ : येथील श्री सप्तशृंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३१ लाख १६ हजारांहून अधिक रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन खाबिया यांनी दिली. सभेत सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेच्या इमारतीत संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्रकाश नेनसुख खाबिया सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सचिन खाबिया यांच्या अध्यक्षखाली वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. संचालक किशोर बोरा यांनी प्रास्तविक केले तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन व्यवस्थापक संजय मोरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सचिन खाबिया यांनी संस्थेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार, कर्जदार व सभासदांचे मोठे योगदान असल्याचे सांगून खाबिया यांनी सर्वांचे आभार मानले. कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करून संस्थेच्या आर्थिक प्रगतीस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अहवालाचे वाचन संजय सोनार यांनी केले.
यावेळी सभासदांच्यावतीने प्रा. आर. एल. पाटील, प्रमोद भांबेरे, किरण गांगुर्डे, कैलास चोपडा, कचरदास करवंदे, सुनिल थोरात, गणेश महाले, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, ज्येष्ठ संचालक प्रकाश कड, अशोक पवार, गोविद थोरात, जयसिंग पवार, दिगंबर पाटोळे, पंडीत मेधणे, संतोष सातपुते, सुनिल समदडिया आदी उपस्थित होते. नितीन झोटिंग यांनी सुत्रसंचालन व ॲड. फरहादखान पठान यांनी मानले.