वणी मर्चंट बँकेस सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार

वणी मर्चंट बँकेस सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार
Published on
VNI26B12960 छत्रपती संभाजीनगर ः ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार स्वीकारतांना बँकेचे संचालक मंडळ. ------------ ३०-२ वणी मर्चंटला दुसऱ्या वर्षीही ‘सर्वोत्कृष्ट बँक’चा पुरस्कार ---------------- वणी, ता.१४ : दिंडोरी तालुक्यासह आदिवासी व ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दि. वणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेस २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडतर्फे देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बँकेस सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. ---------- छत्रपती संभाजीनगर येथील सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीदास यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. बँकेतर्फे संचालक विलास कड, संजय वाघ, हिदायत मुल्ला आणि बँकेचे अधिकारी प्रीतम शेटे यांनी स्वीकारला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा होते. बँकेने २०२५-२६ मध्ये आर्थिक शिस्त व नियोजनबद्ध कारभाराच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. बँकेस एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात यश आले आहे. बँकेच्या ठेवी ८२ कोटी, कर्जवाटप ४३ कोटी, तर मिश्र व्यवसाय १२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्यवसायात १३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. -------- कोट बँकेस राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक प्रथम पुरस्कार हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण. हा पुरस्कार बँकेवर विश्वास ठेवणारे सभासद, ठेविदार, हितचिंतक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारींच्या एकत्रित प्रयत्नांची आणी विश्वासाची पावती आहे. - महेंद्र बोरा, चेअरमन वणी मर्चंट बँक, वणी -----------
Marathi News Esakal
www.esakal.com