पान-२ मेन
-----------
VNI26B12986
नाशिक ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना निवेदन देताना ननाशी येथील महिला.
------------
ननाशीत वाईन शॉपचा ठराव एकतर्फी
----------
महिलांचा आरोप ः २०२२ चा ठराव रद्द करण्यासाठी एल्गार; २३ ला निर्णायक ग्रामसभा
----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१८ ः ननाशी ग्रामपंचायतीने १२ ऑगस्ट २०२२ ला वाईन शॉप सुरू करण्यासंदर्भात केलेल्या ठरावावरून तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीने हा ठराव करताना गावातील नागरिक आणि महिलांना विश्वासात घेतले नाही, ग्रामस्थांना पूर्वकल्पना देण्यात आली नाही तसेच त्यांची मते व हरकती जाणून घेण्यात आल्या नाहीत, असा आरोप करत महिलांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना निवेदन दिले आहे. या ठरावाची चौकशी करून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे दिंडोरीच्या गटविकास अधिकारींना पत्र पाठवून २३ सप्टेंबरला ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभेत वाईन शॉपसंदर्भात ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यात येणार असून, ग्रामसभेसाठी गटविकास अधिकारी तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ग्रामसभेतील उपस्थितांच्या मुद्यांवरून पुढील कार्यवाही होणार असल्याचेही पत्रात नमूद आहे.
सुमित्रा धुळे, लिला वाघमारे, हेमलता वाघमारे, रजना गायकवाड, रखमा सिगाडे, प्रारबता डबाळे, लिलाबाई भोडवे, हेमलता गागोडे, शोभा शेखरे, भोराबाई वाघमारे, जिजाबाई वाघमारे, सुमन वाघमारे, यशोदा शार्दुल, मैना बोके, इंदुबाई गायकवाड, राधा वाघमारे, चंद्रकला डंबाळे, कविता मनारे, नर्मदा मोरे, यशोदा गागोडे, मीराबाई वाघमारे, लक्ष्मी वाघमारे, अनुसया पवार, निर्मला वाघमारे, कल्पना वालझाडे, निर्मला गागोडे आदी महिलांनी या मागणीसाठी निवेदन दिले आहे.
-----------
१६-१
‘ठराव कोणी, कसा आणला ?
वाईन शॉपसंदर्भातील २०२२ चा ठराव करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले होते का? ग्रामसभेपूर्वी नागरिकांना योग्य माहिती देण्यात आली होती का? महिलांच्या हरकती जाणून घेण्यात आल्या होत्या का? या प्रश्नांची उत्तरे आता २३ सप्टेंबरच्या ग्रामसभेत मागितली जाण्याची शक्यता आहे.
१६-१
हरकतींची दखल घेणार का?
महिलांनी निवेदनाद्वारे ठरावाची चौकशी करून तो रद्द करावा, अशी ठाम मागणी केली असून, चौकशीत नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधित ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. प्रशासनाच्या पत्रामुळे आता ननाशीतील वाईन शॉपचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामसभेत ठरावाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होणार का? ग्रामस्थांच्या हरकतींची प्रशासन कशी दखल घेणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
------------