फोटो फक्त दोन कॉ
VNI26B12988
वणी ः पर्युषण महापर्वाच्या सांगताप्रसंगी उपवास करणाऱ्या तपस्वींची काढण्यात आलेला वरघोडा व पालखी
------------------
पर्युषण महापर्वाचा भक्तिमय सांगता
------------
वणी येथे वरघोडा मिरवणूक उत्साहात ः जैन बांधवांकडून क्षमायाचना
----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१८ : वणी येथील श्री शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा भक्तिमय वातावरणात सांगता झाली. पर्वाच्या सांगतानिमित्त विविध कठोर तपश्चर्या करणाऱ्या बाल व युवा तपस्वींचा वरघोडा (शोभायात्रा) गुरुवारी (ता. १७) ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आला. जैन बांधवांनी एकमेकांची क्षमायाचना करत ‘मिच्छामी दुक्कडम्’चा संदेश दिला.
------------
पर्युषण पर्वानिमित्त येथील श्वेतांबर जैन मंदिर तसेच श्री शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पर्वाच्या कालावधीत अष्टान्हिका प्रवचन, कल्पसूत्र व बारसा सूत्र ग्रंथांचे वाचन, पूजाअर्चना, धार्मिक विधी तसेच भजन संध्यांचे आयोजन करण्यात आले. गच्छस्थवीर आचार्य भगवंत श्री ललितशेखर सूरीश्वरजी तसेच साध्वी भगवंत दीप्तीरत्ना श्रीजी यांचे पावन सानिध्य लाभले. येथील जैन पाठशाळेेपासून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पालखी तसेच पर्युषण पर्वात विविध प्रकारचे तप करणारे लव्या पारख, परी बोथरा, नेत्रा बोथरा, सौम्या बोथरा, रिधिमा पारख, प्रीत सिसोदिया, रिदम पारख, दीक्षिता समदडिया, मेघा समदडिया, विरेषा संचेती, युगम पारख, गाथा पारख, देवांश समदडिया, हार्दिक समदडिया, खुशी बोथरा, विरम बोथरा, सरलाबाई इंदरचंदजी बोरा व वैभव इंदरचंदजी बोरा या तपस्वींची आकर्षक रथ, सजविलेल्या कारमधून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. भगवान महाविरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. रथ व वाहनांमध्ये आरूढ बाल तपस्वींवर ग्रामस्थांनी अक्षता व फुलांची उधळण केली.
शोभायात्रेची सांगता श्री शंखेश्वर पार्श्वभ्युदय मंदिरात झाली. वर्षभरात परस्परांमध्ये निर्माण झालेले मतभेद, वैरभाव व कटुता विसरून एकमेकांची क्षमा मागावी, तसेच सर्व प्राणीमात्रांप्रती दया व समभाव ठेवावा, असा संदेश देण्यात आला.
-------------