YEO26B25292
कोपरगाव : विसेन इन्फोटेक कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व इतर.
-------------------
संजीवनीच्या तीस विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज
विसेन इन्फोटेकमध्ये संधी ः शिकत असतानाच नोकरीमुळे पालक समाधानी
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१४ : कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकाचवेळी तीस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेक या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची संधी दिली. या सर्वांना कंपनीने आकर्षक पॅकेज दिले. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट मॉडेलमुळे शेकडो विद्यार्थी शिकवत असतानाच नोकरीला लागून कमावते होत आहे. विसेन इन्फोटेक ही जागतिक पातळीवर आयटी सेवा व सॉफ्टवेअर सोल्युशन क्षेत्रातील नामांकित आहे. ट्रेनिग अँड प्लेसमेंट विभागाने विकसित केलेल्या प्लेसमेंट मॉडेलमुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नामांकित कंपन्यात नोकरीची संधी मिळते आहे. यामुळे संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश म्हणजे हमखास चांगल्या पगाराची नोकरी हे समिकरण दृढ झाले आहे.
नामांकित कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध असल्याने स्वाभाविकपणे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आणि मोठ्या संख्येने नोकरीची संधी मिळते. या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या हर्ष बढे, रोहित बारगळ, निकित भोगे, हिमांशू छाजेड, ईश्वरी देशमुख, दीपक काळे, कल्याणी कर्डे, अक्षय पेटकर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या श्रेयश भागवत, निकिता भोर, सर्वेश्वर भुजाडे, प्रतीक बुलकुंडे, महेश दहे, भक्ती इमले, वैष्णवी जगताप, संज्योत काकडे, श्रेयश घोडके, शुभम कासार, यश खेडकर, स्वरूप मगर, पूणम मंडलिक, ऋतुजा राजपुत, तेजस्विनी फासले, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कुणाल देहरकर, धनश्री गाडे, प्रज्ञा जगताप, भूमी नरोडे, ओम लोखंडे, मुस्तीफा कुरेशी व अनेरी ठाणगे यांची नोकरीसाठी निवड केली. संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले आहे. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम, विभाग प्रमुख उपस्थित होते.
-----------
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. विसेन इन्फोटेक ही आयटी व सॉफ्टवेअर कंपनी आहे. मला माझ्या अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट आयओटी बेस्ड सॉफ्टवेअर फॉर लायब्ररी युझेसची या निवडीसाठी मोठी मदत झाली. संजीवनी शैक्षणिक संकुलाने माझ्यात विविध गुणांची पेरणी केली, ती थेट माझ्या करिअरला गवसणी घालण्यासाठी उपयोगी पडली.
- स्वरूप मगर, विद्यार्थी
--------------