YEO26B25300
येवला : जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी पदाधिकारी.
--------------
२०-१
संभाजी महाराजांना
येवल्यात अभिवादन
येवला : येथील ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष सुभाष पाटोळे यांच्या निवासस्थानी पेढे वाटून जयजयकार करण्यात आला. नारायण क्षीरसागर, सुभाष महाजन, मधुकर सांबरे, बालूशेठ परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजयंती समितीचे कार्याध्यक्ष युवराज पाटोळे यांनी प्रास्ताविक करत भूमिका स्पष्ट केली. अध्यक्ष पाटोळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आयुष्यातील संघर्ष कथन केला. संजय नागडेकर, रमेश भावसार, सुधाकर पाटोळे, दिनेश परदेशी, अमितभाई पटनी, सुभाष साळवे, अनिल हलवाई, अशोक साळवे, विजय पाटोळे, संग्राम पाटोळे, पृथ्वीराज पाटोळे, जालिंदर मेंढकर, प्रवीण गवते, रोहित महाजन, वाल्मीक मगर, ऋषिकेश पाटोळे, नीलेश पाटोळे, संजय पोंदे, सचिन मालोकर, संतोष नागपुरे, सोमा घिगे, सुरेश गवते, रमेश भरते, शिवराज पाटोळे, कृष्णा पाटोळे, आदी उपस्थित होते.
---------