अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतरच्या पावसाने शेतकरी सुखावला

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतरच्या पावसाने शेतकरी सुखावला
Published on
पान-१ मेन YEO26B25701 YEO26B25703 येवला : येथे सोमवारी पहिल्याच पावसामुळे शहरातील रस्त्यावरून वाहणारे पाणी व साचलेले डबके. ------------ जून संपता संपता, वरुणराजा बसरला! ------------ दीर्घ प्रतीक्षेनंतरच्या पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला ः येवला, निफाड, चांदवड, मालेगावला हजेरी ---------------- सकाळ वृत्तसेवा येवला-मालेगाव, ता. २२ : मृगाचे नक्षत्र सुरू झाल्यापासून गायब झालेल्या मॉन्सूनने सोमवारी (ता.२२) अखेर जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर झालेल्या पावसाने बळिराजाला दिलासा दिला आहे. यामुळे वातावरणातही बदल झाला असून उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. पेरणीयोग्य नसला तरी पहिलाचा पाऊस असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालेगाव, येवला, निफाड, लासलगाव, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. ---------------- येवला शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून खरिपाच्या पेरणीचा आशावाद जागा झाला आहे. लांबलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्याही लांबल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे मात्र, आज झालेल्या पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून काहीशी सुटका झाली आहे तसेच मशागतींनाही चालना मिळणार आहे. येवला शहरात जोरदार वादळासह पावसाचे आगमन झाले. अर्ध्या तासाच्या या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले तसेच शहरातील रस्त्यावरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. पावसाने गंगा दरवाजा परिसरातील भुयारी गटार व्यवस्थेची दुरवस्था उघडकीस आली आहे. पावसाचे पाणी तुंबल्याने भुयारी गटारीतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसूल, राजापूर, रेंडाळे यांसह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. या वाऱ्याच्या तडाख्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तसेच काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. १६-१ शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी शेतीकामांना वेग येण्यासाठी आणि पेरण्या योग्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com