अभ्यासासोबतच देशाचा इतिहासही समजून घेण्याची गरज! भारत टाकेकर : कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

अभ्यासासोबतच देशाचा इतिहासही समजून घेण्याची गरज! भारत टाकेकर : कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
Published on
फोटो-25705 येवला : दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक. विद्यार्थ्यांनी देशाचा इतिहासही समजून घ्यावा भारत टाकेकर : येवल्यात काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २३ : विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन अभ्यास करावा व यश मिळवावे व देशाच्या सेवेत योगदान द्यावे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासोबतच देशाचा इतिहास अभ्यासण्याची गरज आहे. काँग्रेसचे देशाच्या जडणघणीत स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांनी केले. येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पद्मावती लाॅन्स येथे लोकसभेचे विरोधीपक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील परीक्षेत शहरासह तालुक्यातील शाळेमध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री. टाकेकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष टाकेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अंगणगाव येथील शुभम बोराळे यांची असिस्टंट डायरेक्टर फूड (ग्रेड- १) पदी निवड झाल्याबद्दल व पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ९६.१४ टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल भक्ती भोरकडे यांचा सत्कार झाला. तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख म्हणाले, की तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सातत्याने समाजोपयोगी व विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यापुढेही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर काय करावे, याबाबत शिबिरे घेणार असल्याचे सांगितले. शुभम बोराळे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा व यश कसे संपादन करण्याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर गायकवाड यांनी केले. आभार तालुका कार्याध्यक्ष विलास नागरे यांनी मानले. जिल्हा उपाध्यक्ष प्रा. प्रकाश खळे, माजी शहराध्यक्ष प्रीतम पटणी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, बळिराम शिंदे, सुरेश गोंधळी, माधव सोळसे, सुखदेव मढवई, युवक काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. नाना शिंदे, रेहान पठाण, अरमान शेख, अण्णासाहेब पवार, विद्याभूषण दुगड, शिवाजी निमसे, बाळासाहेब घोटेकर, दयानंद बेंडके, संदीप दारुंटे, अनिकेत पडवळ आदींसह गुणवंत विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com