४४ किलो प्लास्टिक जप्त,वीस हजार रुपयांचा दंड..! येवल्याच्या आठवडे बाजारात नगरपालिका पथकाची धडक कारवाई

४४ किलो प्लास्टिक जप्त,वीस हजार रुपयांचा दंड..! येवल्याच्या आठवडे बाजारात नगरपालिका पथकाची धडक कारवाई
Published on
पान-४ सेकंड मेन फोटो- 25715 येवला : आठवडे बाजारात मंगळवारी जप्त केलेल्या प्लॅस्टिकसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी. येवल्यात आठवडे बाजारात प्लॅस्टिक जप्त वीस हजार रुपयांचा दंड वसूल; पालिकेची धडक कारवाई सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २३ : यापूर्वी मोहीम राबवून वापरास बंदी असलेले प्लॅस्टिक जप्त करून तंबी देणाऱ्या पालिकेच्या पथकाने मंगळवारी (ता. २३) धडक मोहीम राबवली. मंगळवारच्या आठवडे बाजारात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करत ४४ किलो प्लॅस्टिक जप्त केले असून, दहाहून अधिक विक्रेत्यांकडून सुमारे २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेतर्फे पुन्हा एकदा शहरात धडक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार परिसरासह शहरातील विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या व इतर प्लॅस्टिक साहित्याचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नगर परिषद पथकाने ४४ किलो प्लॅस्टिक जप्त केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २० हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नगर परिषदेची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, व्यापारी व नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे, असे सांगितले. मोहिमेत स्वच्छता विभागातील अधिकारी दीपक जावळे, संदीप बोढरे, लखन बाकळे, वृषाली अहिरे, राहुल जाधव आदींनी सहभाग घेतला. .................... कोट पालिका प्रशासन सातत्याने नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर टाळून शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आवाहन करत आहे. अनेक नागरिक सहकार्य करत असले तरी काही विक्रेत्यांकडून उल्लंघन होत असल्याने आज पथकाने धडक कारवाई केली. -तुषार आहेर, मुख्याधिकारी, येवला .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com