वादग्रस्त जागेवर घरकुल बांधकामामुळे सायगाव येथील कुटुंबाचे उपोषण न्यायालयीन दावा प्रलंबित असताना परवानगी दिल्याचा आरोप,कारवाईच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू

वादग्रस्त जागेवर घरकुल बांधकामामुळे सायगाव येथील कुटुंबाचे उपोषण न्यायालयीन दावा प्रलंबित असताना परवानगी दिल्याचा आरोप,कारवाईच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू
Published on
पान दोन 25742 येवला : पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेले सायगाव येथील सुधाकर पठारे व कुटुंब. वादग्रस्त जागेवर घरकुलाचे बांधकाम सायगाव येथील कुटुंबाचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू सकाळ वृत्तसेवा येवला,ता.२६ : सायगाव (ता. येवला) येथील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर घरकुल प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत पंचायत समिती येथे सायगाव येथील सुधाकर पठारे यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे.नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाने संशयास्पद भूमिका घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. येथील पंचायत समिती समोर आज (ता.२६) तिसऱ्या दिवशी त्यांचे उपोषण सुरू आहे. ज्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू आहे त्या जागेच्या मालकी हक्काबाबत सक्षम दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे.तसेच या संदर्भात ग्रामपंचायतीकडे हरकत अर्ज दाखल करण्यात आलेला असतानाही लाभार्थ्याने बांधकाम सुरू केले. विशेष म्हणजे या वादाची पूर्ण माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला असतानाही बांधकामास परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यापुढे, ग्रामपंचायतीने स्वतः लाभार्थ्याकडून शासनाची रक्कम परत घेण्याबाबत लेखी पत्र दिल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार लाभार्थ्याने रक्कम परत जमा केल्याचे सांगितले जात असले तरी, सुरुवातीलाच अपात्र लाभार्थ्यास मंजुरी कशी देण्यात आली आणि संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत प्रशासन मौन बाळगत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. वादग्रस्त जागेवरील बांधकाम थांबविण्यात यावे, न्यायालयीन वाद प्रलंबित असताना दिलेल्या परवानगीची चौकशी करावी,अपात्र लाभार्थ्यास मंजुरी देणाऱ्याऱ्यांवर विभागीय कारवाई करावी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करावी, नियमभंग आढळल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आंदोलक सुधाकर पठारे यांनी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com