सेवा जेष्ठतेनुसार जिल्ह्यातील ६३ शिक्षक झाले केंद्रप्रमुख..! शैक्षणिक व्यवस्थेला बळ,जिल्ह्यातील रिक्त जागांचा कोरम पूर्ण

सेवा जेष्ठतेनुसार जिल्ह्यातील ६३ शिक्षक झाले केंद्रप्रमुख..! शैक्षणिक व्यवस्थेला बळ,जिल्ह्यातील रिक्त जागांचा कोरम पूर्ण
Published on
जिल्ह्यातील ६३ शिक्षक झाले केंद्रप्रमुख शैक्षणिक व्यवस्थेला बळ, जिल्ह्यातील रिक्त जागांचा कोरम पूर्ण सकाळ वृत्तसेवा येवला,ता.२६ : जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागात मोठा प्रशासकीय निर्णय घेत एकूण ६३ शिक्षकाना केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांचा रिक्त जागांचा कोरम पूर्ण झाला असून शैक्षणिक व्यवस्थेला बळ मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी मर्यादित स्पर्धा परीक्षेतूनच जिल्ह्यात १२४ केंद्रप्रमुखांची नियुक्ती झाली आहे. आता उर्वरित ६३ जागावरही सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती झाल्याने रिक्त जागांचा कोरम पूर्ण झाला आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) तसेच प्रशिक्षित पदवीधर मुख्याध्यापक संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांची निवड करून ही पदस्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी यासंदर्भातील सविस्तर आदेश जारी केले आहेत. या पदोन्नतीनंतर संबंधित शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रिक्समधील एस-१५ ही वेतनश्रेणी लागू होणार आहे. यासोबतच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ नुसार वेतन निश्चिती करताना एक अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही या पदोन्नतीचा शिक्षकांना लाभ होणार आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना केंद्रप्रमुख हे पद शाळास्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. केंद्रप्रमुख हे आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांचे शैक्षणिक निरीक्षण, शिक्षक मार्गदर्शन, अभ्यासक्रम अंमलबजावणी, शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या पदांवर सक्षम व अनुभवी शिक्षकांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस चालना मिळणार आहे. दरम्यान, ही पदोन्नती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध रिट याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे भविष्यात न्यायालयीन निर्णयानुसार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुकानिहाय पदस्थापना सुरगाणा – ८, निफाड – ६, दिंडोरी – ५, बागलाण – ५, येवला – ५, पेठ – ५, त्र्यंबकेश्वर – ५, सिन्नर – ५, नाशिक – ४, इगतपुरी – ४, मालेगाव – ४, चांदवड – ३, देवळा – २, नांदगाव – १, कळवण – १.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com