ऐन दुष्काळात मांजरपाडाच्या पाण्याने ४० हून अधिक बंधारे तुडुंब!

ऐन दुष्काळात मांजरपाडाच्या पाण्याने ४० हून अधिक बंधारे तुडुंब!
Published on
पान-३ मेन करणे YEO26B26537 धामोडे : पावसाअभावी कोरडेठाक असलेला येथील बंधारा कालव्याच्या पाण्यामुळे असा तुडुंब भरला आहे. --------------- ऐन दुष्काळात मांजरपाडाच्या पाण्याने जीवदान ------------ ४० हून अधिक बंधारे तुडुंब ः दुष्काळात खरीप पिकांना दिलासा, २४ दिवस सुरू होते पाणी --------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१ : ऐन पावसाळ्यात पाऊस रुसल्याने संपूर्ण तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना दरसवाडी - डोंगरगाव कालव्याच्या पाण्याने मोठा दिलासा दिला आहे. मांजरपाडा प्रकल्पातून सुटलेले पाणी २४ दिवस कालव्यातून वाहत राहिले. दुष्काळाच्या कठीण काळात ४० हून अधिक लहान मोठे बंधारे तसेच शेततळे व इतर जलसाठे या पाण्याने भरल्याने करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम या कालव्याच्या पाण्याने केले आहे. ---------------- पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यासाठी वरदान ठरले आहे. या पाण्यामुळे तालुक्यातील ४० हून अधिक लहान-मोठे बंधारे पूर्णपणे भरले आहेत. करपून जाणाऱ्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. १६-१ २४ दिवस वाहत होते पाणी.. सुरगाणा भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे मांजरपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते. समीर भुजबळ यांनी लक्ष ठेवून पुणेगाव - दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे हे पाणी चांदवड आणि येवला तालुक्यासाठी प्रवाहित केले. ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट असे सलग २४ दिवस पाणी सुरू होते. या कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसह आपली शेततळी भरून घेण्यासाठी या पाण्याचा प्रचंड फायदा झाला आहे. १६-१ या गावांना मिळाला पाण्याचा थेट लाभ मांजरपाडाच्या प्रवाही पाण्यामुळे येवला आणि चांदवड तालुक्यातील अनेक गावांमधील बंधारे कमी- अधिक प्रमाणात भरले गेले आहेत. कातरणी, आडगाव रेपाळ, विखरणी, कानडी, गुजरखेडे, विसापूर, बाळापूर, धनकवाडी, कासारखेडे, अनकुटे, तांदूळवाडी, सावरगाव, धामोडे, कुसमाडी, सावखेडे, हडपसावरगाव, नगरसूल, अंगुलगाव, डोंगरगाव, सायगाव, वाईबोथी या भागातील बंधारे शेतीलाही कमी अधिक प्रमाणात या पाण्याचा लाभ झाला. १६-१ अवैध उपशामुळे गावांना फटका शेतकऱ्यांनी अल्प पावसात पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने पिके करपू लागली होती. ऐन संकटाच्या काळात मांजरपाडाचे पाणी कालव्याला आल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी कालव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अवैध उपसा केला. या प्रचंड उपशामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नगरसूल, सायगाव आणि वाईबोथी या गावांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडथळा आला. ------------------ कोट मंत्री छगन भुजबळ यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला मांजरपाडा प्रकल्प आणि पूर्णत्वास गेलेल्या डोंगरगाव कालव्याला दुष्काळात पाणी आल्याने त्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. सगळीकडे पाऊस उघडलेला असताना सलग २४ दिवस या कालव्याला पाणी सुरु राहणे म्हणजे मांजरपाडा प्रकल्पाची यशस्वी वाटचाल आहे. पुन्हा पाणी आल्यावर वंचित गावांना प्राधान्याने पाणी देण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत. - डॉ. मोहन शेलार, पाणी आंदोलक -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com